बऱ्याच वेळा आपल्याला काही शारीरिक तक्रारी जाणवत असतात. मात्र, त्याकडे आपण कटाक्षाने दुर्लक्ष करतो. परंतु, कधी कधी हेच लहान-सहान वाटणारे आजार किंवा शारीरिक समस्या पुढे त्रासदायक ठरतात. असंच काहीस एका ६० वर्षीय व्यक्तीसोबत घडलं आहे. या व्यक्तीच्या डोळ्यातून चक्क २० जीवंत अळ्या काढण्यात आल्याचं ‘डेली स्टार’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

चीनमधील वान नामक एका ६० वर्षीय व्यक्तीच्या डोळ्यातून चक्क जीवंत अळ्या काढण्यात आल्या आहेत. वान यांना सतत डोळ्यांची तक्रार जाणवत होती. मात्र, कदाचित थकवा आल्यामुळे डोळे दुखत असतील असा विचार करुन ते या समस्येकडे दुर्लक्ष करत होते. परंतु, दिवसेंदिवस त्यांची समस्या वाढत गेली आणि डोळा प्रचंड दुखू लागला. त्यानंतर त्यांनी सुजो शहरातील एका रुग्णालयात डोळ्यांची तपासणी केली. या तपासणीमध्ये त्यांच्या डोळ्यात अळ्या असल्याचं निष्पण झालं.

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi
ओल्या सोड्याचे कटलेट; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी रेसिपी, मुलंही आवडीनं खातील
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका

वान यांच्या डाव्या डोळ्याखालील पापण्यांजवळ अळ्या आढळून आल्या. त्याानंतर सुजो रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्यांच्या डोळ्यातील अळ्या बाहेर काढल्या . डॉ. शी टिंग यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

“नेमाटोड (अळ्या) हे परजीवी असतात. साधारणपणे आजारी श्वान किंवा मांजरींमध्ये या अळ्या आढळून येतात. मात्र, वान यांच्या डोळ्यात या अळया कशा काय झाल्या हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे वान यांच्याकडे पाळीव प्राणी नसतांनादेखील त्यांच्या डोळ्यात या अळ्या होणं हे आश्चर्यचकित करणारं आहे”, असं डॉक्टर शी टिंग म्हणाले.

दरम्यान, असाच एक प्रकार २०१८ मध्ये अमेरिकेतील एका महिलेसोबत घडला होता. तिच्या चेहऱ्यावर असंख्य डाग होते. मात्र, वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्या डागांखाली अळ्या असल्याचं स्पष्ट झालं होतं.