अनेकांना बसचा प्रवास हा कमी खर्चीक आणि आरामदायक वाटतो. त्यामुळे बरेच जण बसने प्रवास करण्याचा आनंद घेतात. परंतु, अनेकदा बसमध्ये सीट किंवा तिकिटावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये जोरदार भांडण होतं. सोशल मीडियावर बसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या बसमध्ये कंडक्टरचे एका प्रवाशाबरोबर जोरदार भांडण होते आणि त्याचे पर्यवसान हाणामारी होते. दिल्लीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक जण दिल्ली ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन (Delhi Transport Corporation) बसचा उपयोग करतात. या डीटीसी बसमध्येच हा प्रकार घडला आहे.

व्हायरल व्हिडीओ दिल्लीचा आहे. डीटीसी बसमध्ये (DTC) एक प्रवासी आणि कंडक्टरचे तिकिटावरून जोरदार भांडण होते. प्रवाशांनी बस अगदीच गच्च भरलेली असते. एक प्रवासी सीटवर बसलेला असतो. अचानक समोरून कंडक्टर येऊन त्याच्याकडे बोट दाखवतो आणि मारण्यास सुरुवात करतो. हे पाहून प्रवासीही कंडक्टरला सीटवर ढकलून देतो आणि मारण्यास सुरुवात करतो. प्रवासी आणि कंडक्टर यांच्यामधील जोरदार भांडण एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा…

Delhis Vada Pav Girl Get Into Ugly Fight With Crowd On Streets
“ज्यानी तुला पाठवले त्याचा…”, वडापाव गर्ल पुन्हा चर्चेत! भररस्त्यात महिलेबरोबर केली मारामारी; भांडणाचा Video Viral
Bikini-clad woman rides crowded Delhi bus
बसमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या महिलेला पाहून ओशाळले प्रवासी; व्हिडीओ होतोय व्हायरल
Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
Shocking video 9 year old girl going to school was attacked by a pitbull dog
VIDEO: भयंकर! चिमुकला अंगणात खेळत होता; इतक्यात पिटबुल कुत्रा आला अन्..आधी हल्ला, मग ओढून नेलं

हेही वाचा… जेवणातील जास्तीचं तेल काढण्याचा हटके जुगाड, ‘असा’ करा बर्फाचा वापर; Viral Video पाहून व्हाल थक्क!

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, कंडक्टर आणि प्रवासी या दोघांमध्ये आधी वाद होतो. त्यानंतर ते गळा पकडून एकमेकांवर ठोसे मारताना दिसत आहेत. कंडक्टर प्रवासी व्यक्तीच्या शर्टाची कॉलरही पकडतो. समोरची प्रवासी व्यक्तीही त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करू लागते आणि असे बराच वेळ भांडण सुरू असते. पण, ते एकमेकांना हाणामारी करणे थांबवत नाहीत. तसेच हे पाहून आजूबाजूचे अनेक प्रवासी आरडाओरडा करू लागतात आणि प्रकरण हाताळण्याचाही प्रयत्न करतात. यादरम्यान मध्यस्थी करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा इजा होते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘बस कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात डीटीसी बसमध्ये जोरदार भांडण’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नक्की कोणाची चूक आहे, असा प्रश्न नेटकरी कमेंटमध्ये विचारताना दिसत आहेत.