Viral Video: इन्स्टाग्राम, फेसबुक रिल्सद्वारे अनेक इन्फ्लुएन्सर, कन्टेन्ट क्रिएटर तर काही प्रसिद्ध शेफ त्यांच्या पद्धतीत एखादा पदार्थ कसा बनवायचा हे दाखवत असतात. या प्रत्येक व्यक्तींचा आवाज, त्यांची रेसिपी सांगण्याची पद्धत किंवा त्यांचे सादरीकरण प्रत्येकाला आवडते. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यात एका आजीने आलू टिक्की बर्गर कसा बनवायचा हे त्यांच्या अनोख्या स्टाईलमध्ये दाखवलं आहे. चला तर पाहुयात आजीबाईंची आलू टिक्की बर्गर बनवण्याची अनोखी स्टाईल.

व्लॉगर विजय निश्चल असे या आजीचे नाव आहे. रेसिपी दाखवायच्या आधी आजी “क्यू बन गया है तू बंदर? डाल रोटी से तुझे लगता है डर. खाना खाना है तो आजा हमारे घर. क्यूकी आज हम बना रहे है आलू टिक्की बर्गर” ; अशा हिंदी भाषेतील मजेशीर कविता सादर करतात. त्यानंतर मग आलू टिक्की बर्गर कसा बनवायचा हे दाखवण्यास सुरुवात करतात. सुरवातीला त्या एका पॅनमध्ये तेल घेतात. नंतर आलू टिक्की साठी मिश्रण तयार करू लागतात. एका भांड्यात आजी उकडलेले, सोललेले बटाटे घेऊन त्यात कॉर्न फ्लोअर, मीठ, तिखट, चिरून घेतलेलं आलं आणि लसूण व कोथिंबीर, हिरवी मिरची, वाटाणे घालून सर्व काही मिक्स करून एक बारीक मिश्रण तयार करते. तुम्हीसुद्धा पाहा हा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…रुबिक क्यूबचे कोडे सोडविण्यात रोबोटची बाजी; अवघ्या ०.०३५ सेकंदात कामगिरी फत्ते; मोडला गिनीज बुकचा रेकॉर्ड

व्हिडीओ नक्की बघा…

मिश्रण तयार करून घेतल्यावर आजी मिश्राला टिक्कीचा आकार देण्यासाठी, तिच्या तळहाताला थोडे तेल लावते आणि लहान गोळे बनवते व गरम तेलात तळते. त्यानंतर दुसरा तवा घेते व त्यावर थोडं बटर घालून घेते व विकतचे बर्गर भाजून घेते. बर्गरच्या एका बाजूला मेयोनेझ लावते, त्यावर तयार केलेली टिक्की ठेवते आणि मग तंदुर मेयोनेझ लावून घेते. त्यानंतर त्यावर टोमॅटो, कांदा, चीज स्लाईस घालते. नंतर बर्गरच्या दुसऱ्या बाजूला मेयोनेझ लावून आलू टिक्की बर्गर सर्व्ह करते आणि युजर्सना खाऊन सुद्धा दाखवते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आजीच्या @dadikirasoi01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आजी त्यांच्या नवनवीन कवितांसह, वेगवेगळे पदार्थ त्यांच्या स्टाईलमध्ये बनवून दाखवत असतात आणि अनेकांची माने जिंकत असतात. आलू टिक्की बर्गर रेसिपीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आजींना भरभरून प्रेम दिलं आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘इन्स्टाग्रामवरील सर्वांत गोंडस शेफ!’, तर दुसरा युजर म्हणतोय की, ‘आजी, कृपया मला तुमचा पत्ता सांगा. मी तुमच्या घरी बर्गर खायला येतो आहे’. तर तिसऱ्या युजरने “आजी तुम्हाला देव अधिक आरोग्य आणि जीवनात खूप आनंद देवो” ; आदी कमेंट युजरने केल्या आहेत.