Couple Romance On Running Bike Viral Video: प्रेमाचा महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेब्रुवारीत अनेक सुंदर व्हिडीओ समोर आले, पण सध्या समोर आलेल्या जोडप्याचा व्हिडीओ लोकांच्या मनात भीती निर्माण करत आहे म्हणायला हरकत नाही. हा व्हिडिओ २५ फेब्रुवारीचा आहे ज्यामध्ये २१ वर्षीय विवेक रामवाणी समोर बसलेल्या मुलीबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. विवेक बाईक चालवत वेगाने पुढे जात होता. तेव्हा त्याच्या समोर म्हणजेच बाईकच्या पेट्रोलच्या टाकीवर एक तरुणी बसलेली होती. अहमदाबादमधील निकोल रिंग रोड येथे हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. प्रथमदर्शनी मागच्या वाहनातील व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केल्याचे दिसतेय.

प्राप्त माहितीनुसार या जोडप्याचा व्हिडिओ मागील काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल झाला होता. भररस्त्यात बाईक चालवताना केलेले चाळे हे स्वतःसह इतरांचा सुद्धा जीव धोक्यात आणू शकतात असे म्हणत अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला होता. या व्हायरल व्हिडिओची अहमदाबाद ट्रॅफिक पोलिसांनी दखल घेत या तरुणाला अटक केलेच पण शिक्षेचा भाग म्हणून त्याला कान धरून उठाबशा सुद्धा काढायला लावल्या. या कारवाईची माहिती देताना त्यांनी एक वेगळा व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.

Dog Attacked By Brutal Leopard
“तुम्ही मृत्यू घडवून आणलात, नैतिकतेला काळिमा..”, बिबट्याच्या कुत्र्यावरील हल्ल्याचा Video पाहून प्राणीप्रेमी भडकले
csk vs pbks selfish ms dhoni sends back daryl mitchell slammed for denying single ipl 2024
“धोनी तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती, स्वार्थी…”, PBKS vs CSK सामन्यातील धोनीच्या त्या कृतीवर भडकले चाहते, पाहा VIDEO
Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी

तसेच विवेकवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७, १८१, १८४, ११० आणि ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे पोलिसांनी कारवाई केल्याने लोकांनी कौतुक केले असले तरी अनेकांनी पोलिसांवरच टीका केली आहे. असेही काहींनी म्हटंले आहे. “तुम्हाला फक्त तरुणाची चूक दिसते एवढं असेल तर त्या मुलीला सुद्धा अटक करायची होती, उलट तीच जास्त स्टंटबाजी करताना दिसतेय.” सद्य अपडेटनुसार, तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही आणि पोलीस तिला सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

धावत्या बाईकवर कपल झालं बेभान, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

हे ही वाचा<< पोलिसांवर तलवारीने हल्ला, शेतकरी आंदोलनाचा सांगून व्हायरल होणारा Video पाहून सुरु झाला वाद; पोस्टरवर होतं काय?

दरम्यान, आश्चर्य म्हणजे यापूर्वी देशातील विविध भागांमध्ये असाच प्रकार घडला होता आणि तेव्हाही असेच दंड ठोठावण्यात आले होते. मागील वर्षभरात मुंबई. भिवंडी पासून ते जोधपूर, दिल्ली अनेक ठिकाणी असेच प्रकार वारंवार घडत होते. तरीही यातून इतरांनी काहीही धडा घेतल्याचे दिसत नाही. वाहतुकीच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता अशाप्रकारे वर्तन करणे हे मूर्खपणाचे आहे. अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर आल्या होत्या. पोलीस सुद्धा काही हजार रुपये दंड म्हणून घेतात आणि यांना सोडून देतात पण या मंडळींना कठोर शिक्षा दिली पाहिजे अशी मागणीही लोकांकडून होत आहे. तुमचं या व्हिडिओबाबत अंडी मुख्यतः या शिक्षेबाबत काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा.