रस्त्यावर वाहन चालवताना प्रत्येकाला काही नियमांचे पालन करावे लागते. हे नियम वाहनाचा वेग, सीट् बेल्ट, ट्रॅफिक सिग्नल इत्यादींशी संबंधित आहेत. लोकांनी हे नियम नीट पाळावेत यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर तैनात आहेत. जर कोणी या नियमांचे पालन केले नाही तर पोलिस त्यांच्याकडून चालना फाडतात. पण देहराडूनमध्ये वाहतूक पोलिसांचा काही वेगळेच प्रकार पाहायला मिळाला. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांना पोलिसांनी असे काम करायला लावले जे पाहून तुम्हीही हसाल.

अशी शिक्षा दिलेली तुम्ही कधी पाहिली आहे का?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ट्रॅफिक पोलिसांचे जॅकेट घालून रस्त्यावरील वाहनांचे व्यवस्थापन करताना दिसत आहे. काही वेळाने व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती त्याच्याजवळ जातो आणि विचारतो की, ‘पोलिसांनी तुम्हाला काय सांगितले?’ यावर तो सांगतो की, ‘मला ४ तास ट्रॅफिक हँडल करावे लागेल आणि जर करायचे नसेल तर २५०० रुपयांचे चलन फाडावे लागेल.’ तो व्यक्ती पुढे सांगतो की, याआधी एक ई-रिक्षा चालक इथे ट्रॅफिक पोलिसांचे जॅकेट घालून ट्रॅफिक हँडल करत होता. यानंतर त्यांनी मला पकडले तेव्हा त्याला सोडले आणि मला ट्रॅफिक हँडल करायला लावले. तेव्हापासून मी इथे एकही पोलीस पाहिलेला नाही.

भररस्त्यात लावण्यात आले असे साइनबोर्ड, की वाचून गोंधळात पडले लोक; म्हणाले, “वैतागलेले ड्रायव्हर्स…”

पाहा व्हायरल व्हिडिओ

हा व्हिडिओ @HasnaZaruriHai या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर लोकही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.