Premium

खेळण्याच्या नादात लहान मुलीने चिमुकल्याला फेकले विहिरीत; जोरात रडू लागला पण.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO आला समोर

सोशल मीडियावरुन एक धक्कादायक घटना समोर आली असून व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल.

Social Media Viral Video
मुलीने चिमुकल्याला विहिरीत टाकलं (Photo-twitter.com/cctvidiots)

Social Media Viral Video: मुलं खूप निरागस असतात आणि त्यांना खेळायला खूप आवडतं. लहान वयात मुलांची खूप काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या लहानपणी त्यांना हे माहिती नसतं की त्यांच्यासाठी कोणते खेळ खेळणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे काहीही विपरित घडू नये, यासाठी पालकांना मुलांवर सातत्याने लक्ष ठेवावं लागतं. पण आई बाबा कामात असताना प्रत्येकवेळी लहान मुलांकडे लक्ष ठेवणे शक्य नसते. त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडल्याचेही पाहायला मिळते. आता अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही हृदयाचा ठोका चुकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेला हा धक्कादायक व्हिडिओ पाहून सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. या धक्कादायक व्हिडिओमध्ये एक ७ वर्षीय लहान मुलगी खेळत असताना तिच्यापेक्षा लहान ४ वर्षीय मुलाला उचलून विहिरीत फेकताना दिसत आहे.

(हे ही वाचा: परदेशात भारतीय संस्कृतीची जादू! तरुणाने ढोलकी वाजवत गायले ‘हे’ भजन; Video व्हायरल… )

हा व्हिडिओ चीनचा असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला दोन मुलं विहिरीजवळ खेळताना दिसतात आणि थोड्या वेळातच ती लहान मुलगी त्या चिमुकल्याला उचलून विहिरीजवळ घेऊन येते आणि क्षणातच त्याला उचलून विहिरीत फेकते, तो मुलगा जोरजोरात रडू लागतो. पण तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. पडताना तो चिमुकला त्याचे दोन्ही हात विहिरीच्या कठड्यावर ठेवतो. पण ती मुलगी त्याचे पकडलेले दोन्ही हात सोडवून त्याला विहिरीत ढकलून देते. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने लोकांना हादरवले आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @cctvidiots नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामुळे लोक थक्क झाले आहेत. १ मिनिट ३७ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत १४.७ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चीनमध्ये एका लहान मुलीने ४ वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकले.’ व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, “खूप भयानक व्हिडिओ.” आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गावातील इतर लोकांनी त्या मुलाचं रडणं ऐकलं आणि त्याला विहिरीतून बाहेर काढलं. तो मुलगा सुखरुप असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Disturbing video of a seven year old girl throwing a four year old boy into a well in china has gone viral pdb

First published on: 28-11-2023 at 15:13 IST
Next Story
याला म्हणतात नशीब! कारकुनाच्या ‘त्या’ चुकीमुळे पालटलं नशीब; वृद्ध व्यक्ती रातोरात बनला करोडपती