आजकाल परदेशांत राहणारे लोक भारतीय सणांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसतात. तसेच दिवाळी, गणपती आदी सण त्यांच्या देशांतसुद्धा आनंदाने साजरे करताना दिसतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अलीकडेच नेपाळच्या एका उत्सवात लोक भारतीय पद्धतीने भजन गाताना दिसले आहेत; जे पाहून अनेक नेटकरी त्यांचे कौतुक करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेपाळचा आहे. नेपाळमध्ये राहणारे टिकटॉकर आणि संगीतकार नरेश एका उत्सवादरम्यान रस्त्यावर भजन गाताना दिसले आहेत. नेपाळमध्ये एका उत्सवादरम्यान हा खास क्षण पाहायला मिळाला आहे. तरुणांचा एक ग्रुप काळ्या रंगाचा कोट घालून दिसतो आहे. तसेच या सगळ्यांमध्ये टिकटॉकर व संगीतकार नरेश गळ्यात ढोलकी घालून भजन गाणाऱ्यांना साथ देत आहेत आणि त्यांच्याबरोबर असणारे रहिवासी जय गणेश जय गणेश देवा आणि हरे हरे कृष्णा हे हिंदीतील भजन गाताना दिसत आहेत.

हेही वाचा…“ये लोकल दादरसे बँड्रा…” भारतीय तरुणानं अमेरिकेतील ट्रेनमध्ये दिल्या भारतीय रेल्वेच्या सूचना; VIDEO झाला व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा :

नेपाळमध्ये दशई महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये नेपाळमधील टिकटॉकर आणि संगीतकार यांच्याबरोबर काही तरुणसुद्धा आहेत. हे सर्व काळ्या रंगाचा सूट, हातात पुस्तक, तर काही जण डोक्यावर टोपी घालून अगदी मनोभावे भजन गाताना दिसत आहेत. तसेच या भजनाला टिकटॉकर ढोलकी वाजवत साथ देताना दिसत आहेत; तर काही जण टाळ्या वाजवीत भजनाचा आनंद लुटत आहेत. उत्साहात भजन गाताना आणि गणपती बाप्पा व श्रीराम यांचा जयजयकार करणाऱ्या तरुणांचा हा व्हिडीओ तुमचेही नक्कीच मन जिंकेल.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nareshlimbu या टिकटॉकरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘दशई उत्सवानिमित्त गायलं भजन’ अशी या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी विविध शब्दांत तरुणांचे कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसत आहेत आणि सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The magic of indian culture nepal famous tiktoker sing bhajan with his friends asp