Premium

“मम्मी नाही आई म्हणायचं…” चिमुकलीबरोबर आईचा गोड संवाद होतोय व्हायरल, व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या असाच एका मायलेकीचा संवाद चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आई मुलीला चांगले संस्कार देताना दिसत आहे. व्हिडीओत आई चिमुकलीला मम्मी न म्हणता आई म्हणायचं, असं सांगते. हा गोड संवाद ऐकून तुम्हीही भारावून जाल.

do not say mummy say aai a sweet communication of mother with child video goes viral
चिमुकलीबरोबर आईचा गोड संवाद होतोय व्हायरल (Photo : Instagram)

Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. पालक सुद्धा त्यांच्या मुलांचे गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या असाच एका मायलेकीचा संवाद चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आई मुलीला चांगले संस्कार देताना दिसत आहे. व्हिडीओत आई चिमुकलीला मम्मी न म्हणता आई म्हणायचं, असं सांगते. हा गोड संवाद ऐकून तुम्हीही भारावून जाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मायलेकी गप्पा मारताना दिसत आहे. व्हिडीओत सुरुवातीला चिमुकली आईला मम्मा म्हणून हाक मारते. तेव्हा चिमुकलीची आई तिला मम्मा नाही म्हणायचं, असं सांगते तेव्हा चिमुकली आईला मम्मी म्हणून हाक मारताना दिसते तेव्हा तिची आई पुन्हा तिला सांगते की मम्मी पण नाही म्हणायच. त्यावर चिमुकली आईला शेवटी आई म्हणून हाक मारते. तेव्हा तिची आई म्हणते, “हा आई म्हणायचं.” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. चिमुकलीला संस्कार देतानाचा व्हिडीओ आईचा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या आईची आठवण येऊ शकते.

हेही वाचा : VIDEO : तुम्हाला शहरापेक्षा गाव आवडते का? व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल गावासारखा दुसरा स्वर्ग नाही…

natkhat_nayu या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आई” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मस्त शिकवण ताई” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच असे संस्कार केले पाहिजेत आपल्या लहान बाळांवर सगळ्यांनी” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझं बाळ पणं आई म्हणतो खूप छान”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Do not say mummy say aai a sweet communication of mother with child video goes viral ndj

First published on: 07-12-2023 at 11:20 IST
Next Story
बापरे! मगर आणि शार्क एकमेकांच्या समोर आले अन्…समुद्रातील थरारक VIDEO होतोय व्हायरल