Viral Video : असं म्हणतात कुत्रा हा प्रामाणिक अतिशय प्राणी आहे. कुत्र्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण तुम्ही कधी कुत्र्याचा निरागसपणा पाहिला आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्वत:लाच आरशात पाहून कुत्रा स्वत:वरच भुंकताना दिसत आहे. हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक कुत्रा अचानक आरशासमोर येतो आणि त्याला स्वत:चे प्रतिबिंब दिसते पण त्याला ते कळत नाही. त्याला वाटतं की समोर कुत्रा आहे त्यामुळे तो जोरजोराने भुंकायला सुरुवात करतो. आरशातले प्रतिबिंब सुद्धा भुंकताना पाहून तो आणखी जोरजोराने भुंकतो. त्यानंतर तो आरशाच्या मागे कुत्रा उभा आहे का, हे सुद्धा भुंकतो पण त्याला काहीच कळत नाही. व्हिडीओत तो हळूच आरशात पाहतो.

cat and rats true friendship
टॉम अँड जेरी! कधी प्रेम तर कधी राग; मांजर उंदराची अनोखी मैत्री, पाहा व्हायरल VIDEO
pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
a Disabled man climbs kille raigad
खरा शिवप्रेमी! कुबड्या हातात घेऊन सैर केला रायगड, अपंग व्यक्तीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल

समोरचा कुत्रा सुद्धा आपल्या सारखाच वागतोय, हे पाहून तो आणखी अस्वस्थ होताना व्हिडीओत दिसत आहे. कुत्र्याचा हा निरागसपणा पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

हेही वाचा : Personality Test : तुम्हाला कोणता चेहरा आनंदी दिसतो? उत्तरावरुन कळेल तुमचा स्वभाव अन् व्यक्तिमत्त्व

rajberjena या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.