Drunk Girls Viral Video: भारताच्या बहुतांश रस्त्यांवर दारू प्यायल्यानंतर गोंधळ निर्माण करणारे लोक अनेक वेळा पाहिले गेले आहेत. दारूच्या नशेत काही लोक सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात; तर काही जण पोलिसांशी हुज्जत घालतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे पुन्हा एकदा हे दृश्य उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर दिसले. एका तरुणीने दारूच्या नशेत कपडे काढून, रस्त्यावर गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका तरुणीने दारूच्या नशेत गोंधळ घातल्याच्या या व्हिडीओमध्ये मुलगी रस्त्याच्या मधोमध ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा करताना दिसत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या तरुणीला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, ती पोलिसांच्या पाया पडू लागली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

रस्त्यावर तरुणीचा ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा

या व्हायरल व्हिडीओमधील ही घटना कानपूरमधील गुमती येथील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये एक तरुणी रस्त्याच्या मधोमध दारूच्या नशेत नाचताना दिसत आहे. तिने रस्ता अडवला असून, मोठ्या संख्येने लोक ही तरुणी करीत असलेली नाटकं पाहत आहे. संबंधित तरुणीच्या या ‘हाय व्होल्टेज’ ड्रामाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र, ती तरुणी दारूच्या नशेत ‘तर्र’ होती. तिने पुरुष पोलिसांशी झटापट आणि धक्काबुक्की सुरू केली. हे पाहून पोलिस कर्मचारी मागे हटले. त्यानंतर महिला पोलिसाला बोलावण्यात आले.

(हे ही वाचा : पर्यटकांच्या भरगच्च बोटीचे समुद्राच्या मध्यभागी अचानक दोन तुकडे; ‘हा’ Video पाहून भरेल धडकी; पण…)

व्हिडीओमध्ये ती तरुणी आपली पँट खाली उतरवून उभी असल्याचे दिसत आहे. हे पाहून पोलिसांनी तिच्याकडे पाठ फिरवली. घटनास्थळी पोहोचलेल्या पुरुष पोलिसांनी तरुणीला शांत करण्याचा प्रयत्न केला असता, ती त्यांच्या पाया पडू लागली. तरुणीने रस्त्याच्या मधोमध बराच वेळ गोंधळ घातला. त्यानंतर महिला पोलिस आल्यावर तिला गाडीत बसवून नेण्यात आले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेली तरुणी नशेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, तिला नौबस्ता येथील ‘वन स्टॉप सेंटर’मध्ये नेण्यात आल्याचे सांगितले. ही मद्यधूंद तरुणी रस्त्याच्या मधोमध गोंधळ घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ

एकाने लिहिले, “या मुलीवर गोंधळ घालणे आणि रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही?” दुसऱ्याने लिहिले, “कानपूरच्या मुली मुलांपेक्षा कमी नाहीत.” एकाने लिहिले, “कानपूरच्या लोकांनी गोंधळ घालू नये, हे शक्य आहे का?” दुसऱ्याने लिहिले, “दीदी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालत असताना एवढ्या दुःखी का होत्या?” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.