scorecardresearch

दुबईत काम करणारा भारतीय रातोरात कोट्यधीश झाला, असे जिंकले ५५ कोटी रुपये, पत्नीला फोन केला अन्…

अबुधाबीत एका बिग तिकिट ड्रॉ मध्ये या कर्मचाऱ्याला तब्बल ५५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे

दुबईत काम करणारा भारतीय रातोरात कोट्यधीश झाला, असे जिंकले ५५ कोटी रुपये, पत्नीला फोन केला अन्…
एका भारतीय नागरिकाला दुबईत कोट्यावधी रुपयांची लॉटरी लागली आहे.

दिवसेंदिवस बदलणाऱ्या जीवनशैलीमुळं झटपट श्रीमंत होण्याचा खटाटोप अनेक जण करतात. पण सगळ्यांच्या पदरी पैशांचा पाऊस पडेल, हे सांगता येत नाही. पण तुमच्या नशीब तुमच्यासोबत असेल तर, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. असाच काहिसा प्रकार दुबईत घडला आहे. एक भारतीय नागरिक दुबईच्या हॉटेलमध्ये नोकरी करतो. नोकरी करत असतानाच या भारतीय कर्मचाऱ्या कोट्यावधी रुपयांचा जॅकपॉट लागला आहे.

अबुधाबीत एका बिग तिकिट ड्रॉ मध्ये या कर्मचाऱ्याला तब्बल ५५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. साजेश एन एस (४७) असं हॉटेल कर्मचाऱ्याचं नाव असून तो दुबईतील करामा परिसरातली इक्काईस रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतो. दोन वर्षांपूर्वी साजेश ओमान सोडून दुबईत पोहोचला. मागील चार वर्षांपासून साजेश प्रत्येक महिन्याला मोठे तिकिट्स खरेदी करतो.

नक्की वाचा – सावधान! पिझ्झा-बर्गर खाताय, तुम्हाला कर्करोग होऊ शकतो, जाणून घ्या त्यामागचं कारण

Sajesh NS lottery winner

साजेशनं लॉटरीत जिंकलेली ५५ कोटी रुपयांची रक्कम त्याच्यासोबत काम करणाऱ्या २० सहकाऱ्यांसोबत वाटली जाणार आहे. या सर्वांनी साजेशला ऑनलाईन तिकिट जिंकण्यात मदत केलीय. लॉटरी जिंकल्यानंतर साजेश म्हणाला, “मोठी लॉटरी जिंकल्यानंतर मी लगेच भारतात राहणाऱ्या माझ्या पत्नीला फोन कॉल केला. पण त्यावेळी माझ्या पत्नीला विश्वासच बसला नाही. तिला वाटलं, हा एक विनोद आहे. पण काही वेळानंतर तिला याबाबतची सत्यता समजली. जिंकलेल्या पैशांतून लोकांची मदत करायची आहे.

नक्की वाचा – बापरे! इथे माणसांची नाही, चक्क सापांची दुनिया, ‘Snake Island’वर फिरतायेत जगातील सर्वात विषारी साप

मी ज्या हॉटेलमध्ये नोकरी करतो, तिथे जवळपास १५० हून अधिक कर्मचारी काम करतात. मला जितकं शक्य होईल तेवढी मदत माझ्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करायची आहे. जिंकलेल्या पैशांचा योग्य वापर कसा करता येईल, यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसोब चर्चा करेन”. डिसेंबर महिन्यात पुढील लाईव्ह ड्रॉ होणार आहे. यामध्ये एका लकी विनरला Dh30 मिलियनचं बक्षिस पहिल्यांदाच देण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 11:45 IST

संबंधित बातम्या