जेव्हा एखादा पत्रकार टीव्हीवर थेट प्रक्षेपण करत असतो तेव्हा त्याला पुढे काय चुकीचं घडू शकतं याची अजिबात कल्पना नसते. खराब वातावरण ते विक्षिप्त प्राणी आणि संतप्त दर्शक या सगळ्यांचा सामना पत्रकारांना करावा लागत असतो कारण ते थेट टेलिव्हिजनवर एखादी महत्त्वाची बातमी देत असतात. परंतु वेस्ट वर्जिनियाच्या डनबरमध्ये एका महिला पत्रकारासोबत असे काही झाले आहे त्यानंतर लोक तिचे कौतुक करणे थांबवत नाही आहेत. डब्ल्यूएसएझेड-टीव्ही (WSAZ-TV) या वृत्त वाहिनीची महिला पत्रकार तोरी योर्गी स्टुडिओमधील अँकर टीम इर सोबत लाईव्ह रिपोर्टींग करत होती. यावेळी तिला एका कारने मागून धडक मारली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो, योर्गी वेस्ट वर्जिनिया भागातून लाईव्ह रिपोर्टींग करत होती. त्याच वेळेस एका कारने तिला मागून जोरदार धडक मारली आणि योर्गी जमिनीवर पडली. पण या दरम्यान तिने बोलणे बंद केले नाही. ती पुन्हा उठून कॅमेरासमोर आली परंतु यादरम्यान तिचं बोलणं सुरूच होतं.

Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Fact check on pm Narendra Modi waving hand to fish viral video
सुदर्शन सेतू उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी ‘माशांना’ दाखवला हात? जाणून घ्या, व्हायरल Video मागील सत्य
KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला
Betting on Pakistan Super League matches
पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यांवर सट्टेबाजी, चौघांना अटक

बकरीला उंच झाडावरून उतरताना बघितलय? एकदा हा व्हायरल व्हिडीओ बघाच

धडक मारल्यानंतर काही सेकंदानंतर लगेचच योर्गीने रिपोर्टींग करण्यास सुरुवात केली. योर्गीला धडक मारणाऱ्या कारच्या चालकाने गाडीतून उतरून योर्गीची विचारपूस केली. तसेच वृत्तवाहिनीच्या अँकरने देखील योर्गीला याबाबत विचारले असता तिने कॅमेरासमोर येऊन सांगितलं, “मला आतच एका कारने धडक मारली. मी खूप भाग्यवान आहे की मी पूर्णपणे ठीक आहे.’

टिमोथी बर्क नामक व्यक्तीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओला ३६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून २८,००० वेळा लाईक केलं गेलं आहे. या महिला पत्रकाराचे कौतुक करत एका नेटकाऱ्याने म्हटलंय, ‘तोरी योर्गी, २०२२मध्ये मी टीव्हीवर पाहिलेली सर्वात सकारात्मक गोष्ट आहे.’ काहीजण या गोष्टीमुळे नाराज होते की तोरीचा अपघात झालेला असताना देखील तिच्याकडून रिपोर्टींग केली जाण्याची अपेक्षा केली जात होती. एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘योर्गीने धडक बसूनही रिपोर्टींग केले हे चांगले काम केले परंतु अपघात झालेला असतानाही तिने रिपोर्टींग करावी अशी अपेक्षा होती का?’

Video : संकेत म्हात्रे – आवाजाच्या दुनियेतील मराठमोळं नाव । गोष्ट असामान्यांची – भाग १२

हफिंगटन पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, योर्गीचा अपघात झाल्यानंतर तिला चेकआऊट करण्यासाठी ईआरला पाठवण्यात आले. व्हिडीओ पाहिल्यानंतर असे दिसून आले की योर्गी थेट प्रक्षेपणासाठी सर्वकाही एकटीच सांभाळत होती. अपघाताच्यावेळी कॅमेरा पडल्यानंतर तिने स्वतः तो ठीक केला होता.