Shocking accident video: एखाद्या रस्त्यावर अपघात वाढले, की नागरिकांची मागणी म्हणून तेथे गतिरोधक बसविण्याचा उपाय केला जातो. वेगात जाणाऱ्या वाहनांचा अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाकडून रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावण्यात येतात. मात्र हा स्पीड ब्रेकरच जर अपघाताच कारण ठरत असेल तर? सध्या एका धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क हायवेवर स्पीड ब्रेकर बसवले आहेत. त्यामुळे एका मागून एक येणाऱ्या सगळ्या गाड्यांचे अपघात होत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

जीव वाचवणारा स्पीड ब्रेकर ठरला जीवघेणा

Uttarakhand accident video
उत्तराखंडच्या घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य पाहून घाम फुटेल, नक्की चूक कुणाची?
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Pavitra Jayaram Dies In a Car Accident
प्रसिद्ध अभिनेत्री अपघातात जागीच ठार, दुभाजकावर आदळलेल्या कारला बसने दिली धडक, तिघे जखमी
orange ice cream dirty unhygienic making video kanpur ice cream factory dirty video viral
उन्हाळ्यात १० रुपयांची लोकल ब्रँडची आइस्क्रीम आवडीने खाणाऱ्यांनो फॅक्टरीतील ‘हा’ VIDEO पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा विचार कराल
wife with two men in UP hotel
पत्नीला दोन पुरुषांसह हॉटेल रुमच्या बाथरुममध्ये पकडलं; पतीनं तिघांनाही झोडलं, Video व्हायरल
couple caught kissing and indulging in obscene act in crowded crut bus in odisha video goes viral
निर्लज्जपणाचा कळस! बसच्या मागच्या सीटवर कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की….; VIDEO झाला व्हायरल
Gym Trainer tried to rape the women
भरदिवसा जीममध्ये महिलेवर जबरदस्ती; मिठी मारली कपडे फाडले अन्… विनयभंगाचा संतापजनक VIDEO समोर
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक

शहरात गर्दीच्या ठिकाणी, शहरातून जाणाऱ्या महामार्गावर, शाळा, सरकारी कार्यालये, महत्त्वाचे रस्ते, वळणाच्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले आहेत. अपघात टाळण्यासाठी शहरांतर्गत रस्त्यासह राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत; परंतु आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये हायवेवर स्पीड ब्रेकर लावण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. याठिकाणी पूर्वी स्पीड ब्रेकर कदाचीत नसल्यामुळे चालकांना मध्येच बसवण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरची कल्पना नाहीये. तसेच हायवेवर गाडी वेगात असल्यानंही समोर अचानक स्पीड ब्रेकर आल्यावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि अपघात होतात.

स्पीडब्रेकर अपघाताची मालिका

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीची वेळ आहे. एक व्यक्ती ज्या ठिकाणी स्पीडब्रेकर आहे तिथे बॅटरी घेऊन येणाऱ्या गाड्यांना सावध करत आहे. मात्र गाड्यांचा वेग इतका आहे की, तो व्यक्ती दिसेपर्यंत अपघात होत आहेत. येणाऱ्या गाड्या स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळे अक्षरश: उडत आहेत. यावेळी एक रिक्षा प्रवासी घेऊन भरधाव वेगात येते आणि स्पीड ब्रेकरवर आदळून पलटी होते. यावेळी रिक्षामध्ये बसलेले प्रवासीही रिक्षाबाहेर फेकले जातात आणि जखमी होतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> भरदिवसा जीममध्ये महिलेवर जबरदस्ती; मिठी मारली कपडे फाडले अन्… विनयभंगाचा संतापजनक VIDEO समोर

दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळाली नाही. हा व्हिडीओ sarcasmicgag नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला १४६,२९० एवढे लाईक्स आणि लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरीही यावर संतापजनक कमेंट करत आहेत. तर काहीजण सावध करण्यासाठी उभ्या असलेल्या माणसाचं कौतुक करत आहेत.

चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात

असाच एक चिपळूणमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.हा अपघात पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.