उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. समाजवादी पक्षामधील फाटाफुट आणि पित्या पृत्राचा अंतर्गत कलह यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगांत आली आहे. पण या निवडणुकीत एक अनपेक्षित गोष्ट पाहायला मिळणार आहे. कारण निवडणुकीच्या रिंगणात आता चक्क येथील एक स्थानिक बाबा उतरले आहे. विशेष म्हणजे या बाबांनी आतापर्यंत राजकारणात तब्बल १५ वेळी नशीब आजमावले आहे. पण, बाबांना काही यश येईना. आता सोळाव्या खेपेला ते पुन्हा त्याच उमेदीने उभे राहिले आहेत. त्यामुळे यंदा तरी बाबांना विजय प्राप्त होईल का याकडे आता लक्ष लागले आहे.

वाचा : भारतातल्या १% गर्भश्रीमंतांकडे देशातली ५८% संपत्ती..

बाबा, बुवा ही मंडळी राजकारणापासून लांबच राहतात, पण राजकारणी मात्र सल्ले घेण्यासाठी किंवा एकंदर राजकारणातील आपले भविष्य आजमावण्यासाठी कोणत्या ना कोणत्या बाबा बुवांचे उंबरठे झिजवत असतात. अशा बातम्या आपण नेहमी ऐकतो. पण यावेळी उत्तर प्रदेशमध्ये काही वेगळेच पाहायला मिळाले कारण येथल्या फाक्कड बाबांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहिर केले. बरं हे फाक्कड बाबा एक दोनदा नाही तर तब्बल १५ वेळा तोंडावर आपटले आहे. पण निवडणूक लढवण्याचा त्यांच्या उत्साह तसूभर देखील कमी झाला नाही. त्यामुळे २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी बाबांनी चांगलीच कंबर कसली आहे. आपण २० व्या खेपेला विजयी होऊ असा साक्षात्कार त्यांना झाला आहे. त्यामुळे ते २० खेपेपर्यंत अशीच निवडणूक लढवणार आहे.

VIDEO : कॅनेडिअन महापौरांनी केला पगडी बांधून भांगडा

७३ वर्षांचे हे बाबा १९७६ पासून निवडणूक लढवत आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत आपल्याला उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा चेहरा बदलायचा आहे असे त्यांनी सांगितले म्हणूनच त्यांनी यशस्वी होत नाही तोपर्यंत निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे.