scorecardresearch

Oops! मॉडेल टेबलवरून उठली, ड्रेस खेचला अन्.. फॅशन शोमध्ये प्रेक्षकांसमोर घडला विचित्र किस्सा, Video व्हायरल

Viral Video: कधी मॉडेल पाय मुरगळून पडल्याचे, कधी रॅम्पवरच ड्रेसचा काहीतरी घोळ झाल्याने अनेकदा चारचौघात मान खाली घालायची वेळ येते पण आता नव्या व्हिडिओत..

Fashion Show Blunder Viral Video Model Pulls Dress And shocking thing happens Weird Scene Trending
Oops! मॉडेल टेबलवरून उठली, ड्रेस खेचला अन्.. फॅशन शोमध्ये प्रेक्षकांसमोर घडला विचित्र किस्सा (फोटो: इंस्टाग्राम)

Fashion Show Blunder Viral Video: फॅशन शो मध्ये होणारे गोंधळ काही क्षणात सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी मॉडेल पाय मुरगळून पडल्याचे, कधी रॅम्पवरच ड्रेसचा काहीतरी घोळ झाल्याने अनेकदा चारचौघात मान खाली घालायची वेळ येते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोपनहेगन फॅशन वीकमध्ये शो नंतर एक मॉडेल रॅम्पवर चालायला निघताच असं काही घडलं की सर्व प्रेक्षक थक्क झाले होते. हा व्हायरल व्हिडीओ पाहून आता नेटकरीही भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. पण नेमकं असं घडलं काय? चला तर पाहुयात.

गुरुवारी डिझायनर भावंड नन्ना आणि सायमन विक यांनी कोपनहेगन फॅशन वीकमध्ये त्यांचे हिवाळी कलेक्शन सादर केले. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, सह-संस्थापक सायमन विकची पार्टनर व मॉडेल सारा डहल ही रॅम्पवर चालायला म्हणून निघते. जसा कॅमेरा साराकडे वळतो ती आपल्या डिनर टेबलवरून उठून उभी राहते, या जेवणाच्या टेबलवर छान कॅन्डल स्टॅन्ड, जेवणाची ताटं, भांडी अशा अनेक वस्तू ठेवलेल्या असतात जशी सारा उठते व दोन पाऊलं पुढे येते तसं तिच्या ड्रेसला जोडून टेबलक्लॉथसह सगळ्या वस्तू खाली पडून खेचल्या जातात.

कदाचित जेवताना तिने टेबलक्लॉथ बांधलेला असावा आणि गडबडीत उठताना तिच्या लक्षात न आल्याने ड्रेससह सगळं काही खेचून खाली पडलं असावं. पण कॅप्शननुसार हा ठरवून केलेला प्रकार वाटत आहे.

हे ही वाचा<< “आधी फिल्म केली मग राजकारणात संधीसाधून..” गब्बर सिंगचा ‘हा’ जुना Video का होतोय व्हायरल?

@(Di)vision ने इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिल्याप्रमाणे “काही लोक टेबलवर काय आणतात हा प्रश्न असतो, ही मॉडेल स्वतःच टेबल असल्यासारखी निघाली आहे” हे ही अनेकांना पटलंय. काहींनी मी माझ्या एक्स बॉयफ्रेंडच्या लग्नात अशी तयार होऊन जाणार व असंच करणार असंही म्हंटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 18:09 IST
ताज्या बातम्या