scorecardresearch

“आधी फिल्म केली मग राजकारणात संधीसाधून..” गब्बर सिंगचा ‘हा’ जुना Video का होतोय व्हायरल?

Gabbar Singh Viral Video: या व्हायरल व्हिडिओच्या शेवटी अमजद खान यांनी मित्रांविषयी सांगितलेला कटू अनुभव ऐकून नेटकऱ्यांनी

Video Amjad Khan aka gabbar singh old Video Slams Actors In Politics Says All Of Them are Selfish and Liars Except Sunil Dutta
"आधी फिल्म केली मग राजकारणात संधीसाधून.." गब्बर सिंगचा 'हा' जुना Video का होतोय व्हायरल? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Amjad Khan Viral Video: शोले चित्रपटातील गब्बरचे पात्र आजही अनेकांच्या मनातून जाऊ शकत नाही. चित्रपट सृष्टीत पहिल्यांदा एखाद्या व्हिलनला जर सर्वाधिक फॅन्स मिळाले असतील तर तो म्हणजे गब्बर सिंग. हे पात्र गाजवणारे अमजद खान यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या व्हिडीओचे महत्त्व आणखीनच वाढते. एका मुलाखतीत जेव्हा अमजद खान यांना राजकारणात उतरलेल्या कलाकारांविषयी विचारणा करण्यात आली तेव्हा त्यावर उत्तर देताना त्यांनी आपली गब्बर सिंगची निर्भीड झलक दाखवून दिली. अमजद खान म्हणतात की, एक सुनील दत्त सोडल्यास जे कलाकार राजकारणात आले आहेत ते सर्व संधीसाधू आहेत.

म्हणून गब्बर सिंग राजकारणात उतरले नाही..

एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर पुढे म्हणतात, फिल्म्स करून जे कलाकार राजकारणात गेले त्यांना स्वतःचा काही ना काही स्वार्थ पूर्ण करायचा होता. काहींना ते करण्यात यशही आले. आपण या कलारांसारखं खोटं बोलू शकत नाही त्यामुळे मला राजकारणात कधीच जाता येणार नाही असेही खान म्हणाले. राजकारणात आलेल्या प्रत्येकालाच सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं ओझं असतं ते न झेपल्याने कधी ना कधी खोटं बोलावंच लागतं पण मला ते आवडत नाही म्हणून मी राजकारणातून दूर आहे.

अमजद खान यांनी पुढे भारतातल्या भ्रष्टाचारावरही भाष्य केले, ते म्हणाले फक्त भारतातच नाही तर जगात सगळीकडेच भ्रष्टाचार आहे. पण ही वृत्ती वरून खाली म्हणजेच थोडक्यात श्रीमंतांकडून गरिबांकडे आली आहे. यावर एका मालक व नोकराचे उदाहरणही त्यांनी दिले आहे, गब्बर सिंग म्हणजेच अमजद खान नेमकं काय म्हणतात चला तर पाहुयात..

हे ही वाचा<< ‘फुटूरे’ धोक्यात! शाळेतील बाईंचं इंग्रजी ऐकून लागेल वेड! Video मधील प्रत्येक शब्द ऐकताना पोट धरून हसाल

या व्हायरल व्हिडिओच्या शेवटी अमजद खान यांनी मित्रांविषयी सांगितलेला कटू अनुभव ऐकून नेटकऱ्यांनी सुद्धा आपले किस्से सांगितले आहेत. हा व्हिडीओ जुना असला तरी आजच्या स्थितीही लागू होतो असेही अनेकांनी म्हंटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 16:55 IST
ताज्या बातम्या