Bull Fight Video Viral : असे म्हणतात ना की, दोघांच्या भांडणात गरज नसतानाही तिसऱ्याने पडू नये. पण, असे अनेक लोक आहेत जे विनाकारण अशा भांडणात पडतात, ज्याचा परिणाम शेवटी त्यांनाच अनेकदा भोगावा लागतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत असेच काहीसे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत दोन पिसाळलेले बैल भररस्त्यात एकमेकांशी झुंज करत आहेत. यावेळी एक व्यक्ती त्यांना थांबवण्यासाठी म्हणून जवळ जातो, पण शेवटी तो बैल त्याला शिंगावर घेतो आणि नंतर असे काही करतो जे पाहून तुम्हीही शॉक व्हाल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होतोय.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दोन पिसाळलेले बैल रस्त्याच्या अगदी मधोमध झुंज देत आहेत. यावेळी रस्त्याच्या कडेला उभे राहून अनेक लोक त्यांची झुंज पाहत आहेत, तर काही जण व्हिडीओ बनवत आहेत. याचवेळी एक व्यक्ती तिथे येतो आणि तो एका बैलाच्या शेपटीला धरून थांबवण्याचा प्रयत्न करतो. जवळपास अर्धा तास दोन बैलांमध्ये ही झुंज सुरू असते. यावेळी बैल चांगलाच पिसाळतो आणि व्यक्तीला थेट शिंगावर घेऊन थेट हवेत भिरकावतो. यावेळी व्यक्ती थेट हवेत उडून जमिनीवर आपटते. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ बुरहानपूर जिल्ह्यातील राजपुरामधील असल्याचे सांगितले जात आहे.

हा व्हिडीओ @Dharmeshspandey नावाच्या एका एक्स अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) व्हायरल होत आहे. अनेक जण हा व्हिडीओ पाहून शॉक झाले आहेत.