आकाशातील गूढ ताऱ्याला उतरण्यासाठी एका तरूणाने उत्तर प्रदेश पोलिसांना बोलावल्याचा एक मजेशीर घटना घडली आहे. याबाबतचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. शिवाय अनेकांना हा व्हिडिओ पाहून हसू आवरणं देखील कठीण होत आहे. आसमान में संदिग्ध तारे को उतारने के लिए युवक ने बुलाई यूपी पुलिस.. वायरल वीडियो देखकर आप भी हँसते हँसते हो जाओगे लोटपोट. #ViralVideo #Viral pic.twitter.com/hrcgD1YVJE — News24 (@news24tvchannel) October 13, 2020 या व्हिडिओमध्ये हा तरूण पोलिसांना आकाशाकडे बोटं दाखवून तारे दाखवत आहे. तो तारा मला त्रास देत आहे. मध्येच एकदा दिसला व नंतर गायब झाला. त्याला खाली उतरवा.. असं कही तो म्हणत आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट देखील दिल्या आहेत. एकाने याला देशी ठर्रा व गांजाला प्रमोट केलं असल्याचं देखील म्हटलं असून पंतप्रधान मोदींच्या व्होकल फॉर लोकलच्या संदेशाचा संदर्भ देखील जोडला आहे. तर आता पोलिसांना या कामासाठी देखील बोलवलं जाऊ लागलं, असल्याचं एकाने म्हटलं आहे.