Premium

डाळीला तडका, उडाला भडका! थेट कार्यक्रमासाठी सजलेला मंडप जळाला; Video पाहून युजर्स म्हणाले…

व्हिडीओतील व्यक्ती डाळीला असा काय तडका देतो, ज्याने समारंभासाठी उभारलेला मंडप जळून जातो.

fire spreading tadka cooking video is going viral treanding news
डाळीला तडका, उडाला भडका! थेट कार्यक्रमासाठी सजलेलं मंडप जळलं; Video पाहून युजर्स म्हणाले…(@prakash_ujjainy instagram)

स्वयंपाक ही एक कला मानली जाते. कोणतीही कला शिकण्यासाठी जशी काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे स्वयंपाक करतानाही काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असते. कारण तुमची एक चूक जेवणाची चव बिघडू शकते, तसेच स्वयंपाक करताना लक्ष विचलित झाले तर अनेक समस्या उद्भवू शकतात. स्वयंपाक करताना झालेली एक चूक काही वेळा जीवावर बेतल्याची प्रकरणंही अनेकदा घडली आहेत. अशा घटनांशी संबंधित व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती डाळीला असा काय तडका देतो, ज्याने समारंभासाठी उभारलेला मंडप जळून जातो. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील युजर्स हसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती समारंभानिमित्त स्वयंपाक करत आहे. यासाठी त्याने एका मोठ्या पातेल्यात डाळ शिजवून बाजूला ठेवली आहे. कुकिंगच्या काही खास टेक्निक वापरून तो हा स्वयंपाक करतोय. यानंतर तो चुलीवर एक छोटे पातेले ठेवतो आणि त्यात डाळीला तडका देण्यासाठी तेल, मसाल्यासह सर्व साहित्य टाकतो. हे सर्व साहित्य चांगल्याप्रकारे भाजल्यानंतर तो ते पातेलं उचलतो आणि मोठ्या पातेल्यातील डाळीला तडका देतो. पण, या तडक्याचा असा काय भडका उठतो की, ज्याने समारंभासाठी बांधलेला मंडप जळून जातो. या तडक्यादरम्यान जोरदार आगीच्या ज्वाला बाहेर पडताना दिसल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fire spreading tadka cooking video is going viral treanding news sjr

First published on: 10-12-2023 at 16:44 IST
Next Story
तरुणांचं संतापजनक कृत्य, हत्तीला चपलेने त्रास देतानाचा VIDEO व्हायरल; IFS अधिकारी म्हणाले…, “खरा प्राणी…”