Happy New Year 2024: २०२४ या नवीन वर्षाचं मोठ्या दणक्यात आणि उत्साहात स्वागत झाले आहे. सर्वत्र नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे.जगाच्या कानाकोपऱ्यात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.जशी ३१ डिसेंबरची रात्र सेलिब्रेशनसाठी महत्त्वाची असते, तसंच एक जानेवारीचा पहिला सूर्योदयही अनेकांसाठी महत्त्वाचा असतो. कित्येक जण नवीन वर्षातील पहिला सूर्योदय पाहण्यासाठी पहाटे लवकर उठतात. जगाच्या विविध भागातून दिसणाऱ्या सूर्योदयांचा नजारा पाहण्याची त्यांना उत्सुकता असते

नव्या वर्षाचा आजचा पहिला दिवस. हे वर्ष सर्वांना सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावो या शुभेच्छा आणि आशांसह आजचा सूर्य उगवला आहे.स्वप्ननगरी मुंबईतला नववर्षाचा पहिला सूर्योदय तुम्हाला या व्हिडीओमधून पाहायला मिळेल. गुलाबी थंडीमध्ये सूर्यदर्शन खूपच ऊर्जा देणारे आहे.गुलाबी थंडीमध्ये २०२४ या वर्षातील पहिला सुर्योदय पाहण्यासाठी नागरिकांनी सनसेनट पॉईंटवर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यदर्शनाचा नजारा पाहण्यासाठी देखील अनेकजण गर्दी करतात. मुंबई मध्ये गेटवे ऑफ इंडिया वरून काहीसा असा होता सूर्योदयाचा नजारा.

19 April Panchang & Rashi Bhavishya Marathi
१९ एप्रिल पंचांग: कामदा एकादशीला लक्ष्मी नारायण मेष ते मीनपैकी तुमच्या राशीला धनलाभ कसा देणार? वाचा राशी भविष्य
Ayodhya’s Ram Temple Trust Issued Guidelines Banned VIP Darshan
Ram Mandir: अयोध्येत ५०० वर्षानंतर धुमधडाक्यात राम नवमी; ४ दिवस व्हीआयपी दर्शन बंद, १९ तास होणार रामलल्लाचे दर्शन
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
Surya Grahan 12 Rashi Horoscope Today
८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?

मुंबईतला पहिला सुर्योदय हा गेट ऑफ इंडिया येथून टिपलेला आहे. सूर्याची तेजस्वी चमक या क्लिपमध्ये पाहायला मिळत आहेत. ‘स्वप्न नगरी’ म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. प्रत्येक जण आपल्या काहीतरी स्वप्न घेऊन मुंबईत येतो आणि ती पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतो. एरवी घडाळ्याच्या काट्यांवर धावणाऱ्या मुंबईती हा पहिला निवांत सुर्योदय पाहून मुंबईकर सुखावले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> विमान लँड होणार तोच आला सोसाट्याचा वारा अन्…; लंडनमध्ये प्लेन लँडिंगचा थरारक VIDEO व्हायरल

कोकण किनारपट्टी आणि मुंबई शहर हे अतिपश्चिमेकडे असल्याने येथे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही उशिरा होतात. मुंबई शहर जरी महागडं असलं तरीही राहण्यासाठी मुंबई शहराकडेच लोकांचा सर्वाधिक कल असल्याचं देखील सर्वक्षणातून समोर आलं आहे. संपूर्ण देशातील विविध कंपन्यांची पहिली पसंती ही मुंबईलाच आहे. देशातील इतर शहरांचा विचार केला तर मुंबईमध्ये सर्वाधिक कंपन्या आहेत