चोरी करण्यासाठी चोर कधी कोणती युक्ती वापरेल सांगता येत नाही. त्यात प्रत्येक चोराची चोरी करण्याची स्वत:ची अशी एक पद्धत असते; ज्याद्वारे ते चोरी करतात. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात; ज्यामधील चोरांच्या चोरीची पद्धत पाहून अनेकदा अवाक् व्हायला होते. सध्या असाच एका चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एक तरुणी जीन्स चोरी करण्यासाठी अशी काय युक्ती वापरते, जी पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. पण तिचीही चोरी फार काळ लपून राहत नाही. यावेळी महिला दुकानदार चोरट्या तरुणीला रंगेहात पकडतात आणि चोरीबद्दल अशी काय अद्दल घडवतात की, ती आयुष्यात शेवटपर्यंत कधीही विसरणार नाही.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी कपड्यांच्या दुकानात तरुणी चलाखीने चोरी करण्याच्या उद्देशाने दोन ते तीन जीन्स घालून, पळून जाण्याच्या तयारीत होती. पण, तिची ही चोरी दुकानदारांच्या लक्षात येते आणि तो तिला रंगेहाथ पकडतात. इतकेच नव्हे, तर ते भरदुकानात तरुणीला चोरलेल्या जीन्स एक-एक करून काढण्यास सांगतात.यावेळी चोर तरुणी शरमेने एक-एक करून सर्व जीन्स काढू लागते. या घटनेमुळे संपालेल्या महिला दुकानदार एक एक करुन तिच्या कानाखाल लगावतात. यानंतर दुकानदार चोरट्या तरुणीला चोरीबद्दल अशी काय अद्दल घडवताच की ती पुन्हा आयुष्यात चोरी करण्याचा विचार करणार नाही.

Ladki Bahin Yojana, brothers, Ladki Bahin,
‘बहिणीं’नो, दीड हजार रुपयांसाठी ‘भावां’ना प्रश्न विचारण्याची ताकद गमावू नका…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद
News About Akshay Shinde
Badlapur Crime : “अक्षय निर्दोष आहे, पोलिसांनी माझ्या मुलाला..”, बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या आई-वडिलांचा दावा
self-reliance, school play, responsibility, vegetables, family values, loksatta balmaifal
बालमैफल: सोनाराने टोचले कान
Ambadas Mohite, Rakshabandhan, Maharashtra, abuse-free society, gender equality, respect for women,
रक्षाबंधनाला, मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या देणार नाही, असे वचन…
how to identify that are you just Meant For A 9 to 5 Desk Job or not | job news in marathi
तुम्ही ‘९ ते ५’ च्या नोकरीसाठी बनला आहात की नाही? ‘या’ पाच गोष्टी वाचल्यानंतर लगेच मिळेल उत्तर
Challenges Facing Transgender Persons
तृतीयपंथीयांनी जगावे तरी कसे?

हा व्हिडीओ @cctvidiots या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; ज्यावर आतापर्यंत हजारो लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरने लिहिले, दीदी खूप स्मार्ट होत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये एका युजरने या मुलीची स्टोरीही शेअर केली आहे; जी वाचल्यानंतर कोणाचेही हृदय भरून येईल.

युजरने लिहिले की, मुलगी अत्यंत गरीब कुटुंबातून आली आहे. तिची आई शाळेत जेवण बनवण्याचे काम करते आणि वडील गार्ड म्हणून काम करतात. तिची आई आजारी पडल्यामुळे तिचा अभ्यास थांबला आणि तिने विद्यापीठात जाणे बंद केले. ती स्वकमाईच्या पैशावर अवलंबून होती. दुकानात केलेल्या चोरीच्या या घटनेनंतर तिला न्यायालयात हजर व्हावे लागले. कोर्टाने तिला तुरुंगात पाठवण्याऐवजी रोज कोर्टात हजर राहण्यास सांगितले, तसेच तिला नवीन नोकरी शोधण्याचे आणि शिक्षण पूर्ण करण्याचे आदेशही दिले. पण, युजर्सन दिलेली ही माहिती कितपत खरी आहे याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.