Viral video: सध्या उन्हाळा असल्याने लोक मोसमी फळांचा आस्वाद घेत आहेत. कोणी आंबा खात आहेत, कोणी टरबूज खात आहेत, कोणी खरबूजचा आस्वाद घेत आहेत. अशा स्थितीत रसायनयुक्त फळांनी या दिवसांत बाजारपेठेत स्थान निर्माण केले आहे. उन्हाळा सुरू झाला की आंब्याचा सिझन येतो. देशात विविध भागांमध्ये आंबे विक्रीला येऊ लागतात .अनेक लोक या आंब्याचे इतके शौकिन असतात कि जर आसपास कुठे आंबे मिळाले नाही तर अनेक किलोमीटर दूर जाऊन ते आंबे खरेदी करतात. अनेक जण हे आंबे घरच्या घरी पिकायला ठेवतात, आंबे पिकवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तूम्ही आजपर्यंत पाहिल्या असतील. मात्र, आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एखा व्यक्तीनं अवघ्या काही सेंकदात हिरव्या कैरीला पिकवलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

१ सेकंदापेक्षा कमी वेळात आंबा पिवळा झाला

एक व्यक्ती झाडांवर उगवलेले आंबे रंगाच्या बादलीत बुडवून रंगीबेरंगी बनवत आहे. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे ज्याची लोक खूप मजा उडवत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक माणूस त्याच्या बागेत पिकणारे कच्चे आंबे पिकवण्यासाठी जुगाड वापरतो. ज्यामध्ये आंबे फक्त १ सेकंदात पिकतात आणि लाल होतात. झाडावर असलेला कच्चा आंबा एक माणूस रंगाच्या बादलीत बुडवतो, ज्यामुळे आंबा नारंगी रंगाचा होतो आणि ते अगदी पिकलेल्या आंब्यासारखा दिसतो. जरी हा आंबा फक्त बाहेरून पिकलेला दिसत असला, तरीही तो कच्चा आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मजेदार व्हिडिओबाबत यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. युजर्सच्या प्रतिक्रिया काय आहेत ते तुम्हीच वाचा.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जेवढा पगार तेवढंच काम” मजुराला काम करताना थांबवलं कुणी? VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

प्रोफेसर ऑफ मीम्स नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत २ लाख ५५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर अनेकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. यावर यूजर्स आपल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. एका यूजरने लिहिले…आम्ही आंबा त्याची साल काढून खाऊ. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…व्वा, काय काम आहे. तर दुसऱ्या यूजरने लिहिले… मला माझं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळत नाही, नाहीतर आमच्यातही टॅलेंटची कमतरता नाही.