ती : सांग ना मिठीतली ‘मी’ पहिली की दुसरी?
तो : अॅ?? हे काय?
ती : अरे पहिली की दुसरी?
(चेहऱ्यावरची भीती आणि गोंधळ त्याला लपवता येत नव्हता.)
ती : अरे लवकर सांग, माझं काम अडलंय
तो : तुला का ते जाणून घ्यायचंय? कोणाचा तरी भूतकाळ उकरून काढण्याची ही वेळ आहे का?
ती : अरे लेख लिहितेय मी, ‘मिठी’ की ‘मीठी’ लिहू? माझा गोंधळ झाला ना. त्यातून मी इंग्लिश मिडियमची आहे! you know ना, माझ्या किती चूका होतात, म्हणून विचारलं मिठीतली मी पहिली की दुसरी .
(आता कुठे बिचाऱ्याला हायसं वाटलं)
तो : मग सरळ ऱ्हस्व की दीर्घ असं विचार ना? पहिली की दुसरी हे काय? हात जोडले बुवा तूझं मराठी ऐकून.
ती : असू दे, जास्त शहाणपणा दाखवू नकोस तू! पण, by the way तू का घाबरलास रे इतका ?
तो : छे! काही काय? मी का घाबरू? हे मात्र उगाच.
ती : उगाच कसं? पाहिलं मी तुझ्या चेहऱ्यावर किती बारा वाजले होते ते.
(आता काय ही बया मला सोडणार नाही, त्याची खात्री पटली.)
तो : ‘तू पहिली’ असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही, ‘तू दुसरी’ म्हटलं तर ही मला जगू देणार नाही.)
ती : सांग ना तूझ्या मिठीतली मी पहिली की दुसरी?
तो : ‘तू… पहिलीच’
ती : thank you! (काहीशी लाजून)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तो : बापरे, इतक्या लवकर विश्वास बसला?
ती : मग काय! तू मिठी कसा मारतोस यावरून सगळं समजलं मला की तुझ्या मिठीतली बहुदा ‘मी’ पहिलीच असणार.
तो : असं पण असतं का? ‘आयला ये अपूनको मालूमही नही था!’
ती : Hahaha! एक तर तूला नीट hug करता येतच नाही. तूझी हग करण्याची पद्धतच जगावेगळी. समोरून मिठी मारायची नाही, बाजूनं मिठी मारायची, मिठी मारताना अंग आकसून घ्यायचं, नेहमी वितभर अंतर ठेवायचं वगैरे वगैरे. त्यावरुन समजलं मला. i am so smart !
तो : बरं..(काहीसा हसत.) (हिला आता खरं कसं सांगू? उद्या पासून मैत्रिणींना पण, मिठी मारायची बंद होईल ही)
ती : ते जाऊदे पण, खरंच तूला का नाही आवडतं रे hug करायला?
तो : आमच्यात कोण अशा मिठ्या वगैरे मारत नाही.. (काहीसा तुसडेपणानं)
ती : आमच्यात म्हणजे? मिठ्या मारणारे लोक काय परग्रहातून येतात की काय?
तो : नाहीतर काय. आधी समोरच्याला बघून परमानंद झाल्यासारखं किंचाळायचं, मग उड्या मारत उगाच मिठ्या मारत बसायचं. प्रसंग काहीही असो. मग तो आनंद असो की दु:ख उगाच मिठ्या मारायच्या. नको तो खुळचटपणा.
ती : खुळचटपणा काय त्यात? अरे व्यक्त होण्याची पद्धत आहे ती. काही गोष्टी नजरेतून व्यक्त होतात. काही गोष्टी शब्दांतून व्यक्त होतात आणि या दोन्ही गोष्टीतून जे व्यक्त होत नाही ते मिठीतून व्यक्त होतं.
तो : तुम्ही लोक कसलंही ‘लॉजिक’ लावता बुवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy hug day 2019 special article
First published on: 12-02-2019 at 13:46 IST