scorecardresearch

Premium

हृदयस्पर्शी! मालकाने दिलं अनोखं सरप्राईज, आवडत्या टेडीसारखी कपडे घालून येताच कुत्र्याचा आनंद गगनात मावेना, VIDEO पाहाच

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील मोजकेच व्हिडीओ असे असतात जे नेटकऱ्यांना भावतात आणि ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात.

When the owner dresses up like the dog's favorite teddy
कुत्र्याचा आणि त्याच्या मालकाचा मनमोहक VIDEO व्हायरल. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ आपणाला आश्चर्यचकित करणारे असतात तर काही आपलं मनोरंजन करणारे. पण या हजारो व्हिडीओमधील मोजकेच व्हिडीओ असे असतात जे नेटकऱ्यांना भावतात आणि ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकल्याचं पाहायला मिळत आहे. तर या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे आणि तो लोकांना एवढा का आवडला आहे ते जाणून घेऊ या.

सोशल मीडियावर पाळीव प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. ज्यामध्ये कुत्रा किंवा मांजराचे त्यांच्या मालकाशी असलेलं प्रेमळ नातं पाहायला मिळतं. शिवाय अनेकदा या प्राण्यांचे मालकदेखील आपल्या कुत्र्याला भन्नाट असं सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे तो खुश होईल. सध्या एका मालकाने असंच काहीसं त्याच्या कुत्र्याला सरप्राईज दिलं आहे, जे पाहून कुत्रा खूप खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे.

How to deal with a difficult boss
तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….
inflammation food body reduce intake health special
Health Special: काय खाण्याने अंतर्गत शारीरिक दाह कमी होतो?
gobi manchurian marathi news, gobi manchurian banned in goa
एकट्या मंचुरियननेच यांचं काय बिघडवलंय?
kuno three cheetah cubs marathi news, kuno cheetah project marathi news, cheetah marathi news
विश्लेषण : कुनोतील चित्त्यांचे बछडे यंदा तरी जगतील का? अजूनही कोणती आव्हाने?

हेही पाहा- VIDEO: घाबरलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला वाचवण्यासाठी देवदूत बनला तरुण; जीवाची पर्वा न करता भरधाव वाहनांमधून गेला पळत

या व्हायरल व्हिडीओतील कुत्रा त्याच्या आवडत्या टेडीशी खेळताना दिसत आहे. यावेळी त्याचा मालक त्याच्या आवडत्या टेडीसारखी कपडे घालून येतो. कुत्रा ज्यावेळी मालकाला पाहतो त्यावेळी त्याला त्याचा आवडता टेडी चालत आला आहे असं वाटतं. त्यामुळे तो खूप प्रेमाने मालकाच्या अंगावर उड्या मारायला सुरुवात करतो. यावेळी कुत्र्याला किती आनंद झाला आहे, याचा अंदाज व्हिडीओ पाहून लावता येऊ शकतो.

या कुत्र्याचा आणि त्याच्या मालकाचा हा मनमोहक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत तो ६ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “खूप मनमोहक” तर आणखी एकाने लिहिलं आहे, “हे खरं प्रेम आहे.” तर दुसऱ्याने लिहिलं “हे खूपच हृदयस्पर्शी दृश्य आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heartwarming video of a dog and its owner goes viral on social media jap

First published on: 02-10-2023 at 16:32 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×