ई-बाईकचा अचानक स्फोट झाल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या, अशाच एका घटनेत ई-बाईकचा स्फोट झाला असून यात एक टुरिस्ट हॉस्टेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना सिडनीतील टुरिस्ट हॉस्टेलमध्ये घडल्याचा दावा केला जात आहे. जेथे ई-बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला, त्यामुळे एका टुरिस्ट हॉस्टेल असलेल्या बहुमजली इमारतीला भीषण आग लागली.

आगीच्या घटनेनंतर ७० हून अधिक बॅकपॅकर्सना तात्काळ बाहेर काढण्यात आले. या भीषण घटनेचा व्हिडीओ फायर अँड रेस्क्यू FRNSW च्या अधिकृत हँडलवर शेअर करण्यात आली आहे.

Little boy plays with stray dogs on waterlogged roads of Mumbai
रस्त्यावर साचलेल्या पाण्यात भटक्या कुत्र्यांसह खेळतोय चिमुकला, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू
emotional video
अचानक कोणी आलं अन् हातात चिठ्ठी दिली! टेन्शनमध्ये बसलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावर काही क्षणात हसू आलं; काय होतं चिठ्ठीमध्ये? पाहा Video
Neighbours rescue a man from burning apartment
याला म्हणतात खरी माणुसकी! जळत्या अपार्टमेंटमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा शेजाऱ्यांनी वाचवला जीव, व्हिडीओ व्हायरल
Man intestines fall out while he was having breakfast at a restaurant
बापरे! नाष्टा करताना शिंक व खोकला एकत्र आल्याने माणसाचं आतडंच बाहेर आलं, नक्की काय घडलं वाचा
Video: Kanpur man's 'Titanic' pose on moving bike invites police action shocking video
‘अशा मुलांमुळेच होतात अपघात’ चालत्या बाईकवर ‘टायटॅनिक’ पोजमध्ये स्टंटबाजी; तेवढ्यात पोलीस…VIDEO व्हायरल
a young man hides wine bottle in secret locker of vehicle
पठ्ठ्याने गाडीमध्ये ‘या’ सीक्रेट जागी लपवल्या दारूच्या बाटल्या; VIDEO पाहून डोकं धराल
young boy in pune enjoys Rain
“पुणेकरांचा नादखुळा!” पावसाचा आनंद लुटणाऱ्या पुणेरी तरुणाचा व्हिडीओ बघाच, पोटधरुन हसाल
rahul gandhi latest news
काफी गर्मी है! उन्हामुळे त्रासलेल्या राहुल गांधींनी भर सभेत डोक्यावर ओतलं थंड पाणी; पाहा व्हिडीओ

या घटनेतून दोन तरुण थोडक्यात बचावल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हॉस्टेलच्या गॅलरीत एक तरुण हातात बूट घेऊन उभा आहे. तो एका रुममध्ये असलेला मित्र बाहेर येण्याची वाट पाहत असतो. यावेळी अचानक एक मोठा स्फोट होतो आणि त्याचा मित्र आगीच्या लोटातून उडी मारून आपला जीव वाचवतो. त्यानंतर दोघेही एकत्र घटनास्थळावरून पळून जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना ‘मंकी डाउनटाउन बॅकपॅकर्स हॉस्टेल’मध्ये घडली आहे. ई-बाईकमधील लिथियम-आयन बॅटरीच्या स्फोटामुळे ही घटना घडली.

हा स्फोट इतका भीषण होता की, आग वेगाने हॉस्टेलभर पसरली; ज्यामुळे सर्व पाहुण्यांना बाहेर काढण्यात आले. तसेच एका २० वर्षीय जखमी मुलाला सुरक्षित स्थळी नेण्यात आले. त्याच्या पायाला किरकोळ भाजल्याने पुढील उपचारासाठी सेंट व्हिन्सेंट रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यात त्यांना यश आले. मात्र, आगीमुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या, FRNSW तज्ज्ञ NSW पोलिसांच्या सहकार्याने प्रकरणाचा तपास करीत आहेत. मात्र, ई-बाईकच्या खराब बॅटरीमुळे हा स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लोक अवाक् झाले आहेत. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येऊ लागला की, ई-बाईक हॉस्टेलच्या आत कशी पोहोचली? त्यावर अनेक युजर्सनी कमेंट करीत आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहे.