Premium

कार ट्रॅफिकमध्ये अडकली असतानाच लागली भूक, ऑर्डर केला पिझ्झा, थेट कारमध्ये पिझ्झा डिलिव्हरी केल्याचा VIDEO व्हायरल

सध्या सोशल मीडियावर बंगळुरुमधील वाहतूक कोंडीदरम्यानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Traffic Jam Bengaluru viral video
वाहतूक कोंडीतील पिझ्झा डिलिव्हरी. (Photo : Twitter)

सध्या सोशल मीडियावर बंगळुरुमधील वाहतूक कोंडीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बंगळुरुमधील एका रस्त्यावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या व्यक्तीने चक्क त्याची कार ट्रॅफिकमध्ये असतानाच ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर केल्याचं दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या पिझ्झाची डिलिव्हरीदेखील कार ट्रॅफिकमध्ये असतानाच करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तर नेमकी ही घटना आहे काय ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऋषिवत्स नावाच्या एका युजरने कार ट्रॅफिकमध्ये अडकलेली असताना डॉमिनोज पिझ्झाची डिलिव्हरी मिळाल्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. बंगळुरूमधील एका रस्त्यावर ऋषिवत्स यांची कार ट्रॅफिकमध्ये अडकली होती. यावेळी त्यांना भूक लागल्यामुळे त्यांनी पिझ्झा ऑर्डर करण्याचं ठरवलं शिवाय लाईव्ह लोकेशन शेअर करत कारमध्ये डिलिव्हरी मिळते का याची ते वाट पाहू लागले. यावेळी डॉमिनोजमधून पिझ्झा घेऊन दोन एजंट त्यांच्या स्कूटरवरुन येतात, त्यांची बाईक रस्त्यावर उभी करतात आणि वाहतूक कोंडीत अडकलेल्या कारमध्ये पिझ्झा नेऊन देतात. ही सर्व घटना ऋषिवत्स यांनी त्यांच्या कारमधून शूट केली आहे.

हेही पाहा- “कठीण प्रसंगी…” भरधाव रेल्वेमध्ये अडकला तरीही धीर नाही सोडला; घोड्याचा VIDEO शेअर करत IAS अधिकाऱ्याने दिला मोलाचा संदेश, म्हणाले…

या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना युजरने ट्विटमध्ये लिहिलं की, जेव्हा आम्ही बंगळुरुमधील वाहतूक कोंडीत अडकलो होतो तेव्हा डॉमिनोजकडून काहीतरी ऑर्डर करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या लाईव्ह लोकेशनच्या मदतीने वाहतूक कोंडी झालेल्या रस्त्यावर आम्हाला पिझ्झा मिळाला.

…म्हणून झाली होती वाहतूक कोंडी –

या घटनेचा व्हिडीओ आतापर्यंत ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर नेटकरी या त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. २७ सप्टेंबर रोजी बंगळुरूमध्ये खूप वाहतूक कोंडी झाली होती. ज्यामुळे अनेक तास वाहने रस्त्यावर अडकून पडली होती. तर या वाहतूक कोंडीचा शहरातील आऊटर रिंग रोड (ओआरआर) भागाला सर्वाधिक फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय त्यामुळे वाहने एकाच ठिकाणी पाच तासांपेक्षा जास्त काळ अडकल्याची तक्रार देखील नागरिक करत आहेत. तर शेतकरी आणि कन्नड संघटनेच्या ‘कर्नाटक जलसंधारण समिती’ने पुकारलेल्या बंगळुरू बंदच्या एका दिवसानंतर ही वाहतूक कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hungry while car stuck in traffic ordered pizza video of pizza delivered directly in car goes viral jap

First published on: 28-09-2023 at 16:18 IST
Next Story
बापरे! या आजोबांकडे आहेत तब्बल १०० कोटींहून अधिक किमतीचे शेअर्स; VIDEO पाहून व्हाल चकित