सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात, यातील काही आपणाला थक्क करणारे असतात तर काही आपलं मनोरंजन करणारे असतात. पण काही व्हिडीओ असे असतात ज्यातून आपणाला काहीतरी शिकायला मिळतं, जीवनात काहीतरी करण्यासाठी प्रेरणा मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कठीण प्रसंगातही शांत राहून आणि विचलित न होता पुढे कसे जाता येते याचं उदाहरण पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये एक घोडा मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बचावल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडला असून कोणत्याही कठीण परिस्थितीतून कसे बाहेर पडता येऊ शकतं हेच या व्हिडीओतून शिकायला मिळत असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कुठला आहे याबाबतची माहिती मिळालेली नाही. मात्र अनेकजण तो शेअर करत आहेत. आयएएस अधिकारी संजय कुमार यांनीदेखील हा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “दोन रेल्वेच्या रुळामध्ये अडकलेला हा घोडा विचलित न होता सरळ पळत राहिला, त्यामुळे तो वाचला. आयुष्याचं देखील असंच असतं. कठीण प्रसंगी जे विचलित होत नाहीत ते जीवनातील प्रत्येक संकटातून सुकरुप बाहेर पडतात.”

हेही पाहा- जमावाने चक्क Apple स्टोअर लुटलं, महिलेने सुरु केलं थेट प्रक्षेपण, आयफोन घेऊन पळणारे लोक कॅमेऱ्यात कैद

हा थरारक आणि तितकाच प्रेरणादायी व्हिडिओमध्ये एक घोडा दोन रुळांमध्ये अडकल्याचं दिसत आहे. यावेळी अचानक दोन्ही बाजून दोन रेल्वे येतात. रेल्वेचा आवाज ऐकून घोडा जोरजोरात धावायला सुरुवात करतो. मात्र या वेळी तो विचलित होत नाही आणि दोन्ही रेल्वेमधून सरळ धावत राहतो. काही वेळाने भरधाव वेगाने रेल्वे निघून जातात आणि घोडा रुळावरून बाजीला जातो. रेल्वेत बसलेले प्रवासीदेखील घोड्याला पाहताच जोरजोरात ओरडत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. तर आरडाओरडा करणार्या प्रवाशांवर नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. घोडा विचलित होत नाही, परंतु रेल्वेत बसलेले लोक एवढा आरडाओरडा का करत आहेत? त्यांच्या आवाजामुळे घोड्याचा अपघात होऊ शकला असता, असं लोक म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An ias officer gave a valuable message by sharing a viral video of a horse stuck in a fast moving train jap
First published on: 28-09-2023 at 11:45 IST