scorecardresearch

नवरा-बायकोच्या भांडणात संतापलेल्या पत्नीने पलंगावरच बांधली विटांची भिंत, पाहा Viral Video

सोशल मीडिया हा मनोरंजनाचा खजिना आहे. इथे रोज मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात.

quarral
नवरा-बायकोच्या भांडणात संतापलेल्या पत्नीने पलंगावरच बांधली विटांची भिंत, पाहा Viral Video

सोशल मीडिया हा मनोरंजनाचा खजिना आहे. इथे रोज मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. व्हिडीओ पाहून क्षणभर तुमचे दु:ख विसरता येतं. यातील काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की, ते पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका दांपत्याचा. घरं म्हटलं की भांड्याला भांड लागतंच. त्यात पती-पत्नीचं भांडण होत नसलेलं एकही घर नसेल. प्रत्येक घरात पती-पत्नीचं भांडण ही सामान्य गोष्ट आहे. पण भांडण झाल्यानंतर पत्नीने उचलेलं पाऊल पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मजेशीर व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

भांडणानंतर पती-पत्नी एकमेकांवर नाराज असल्याचे दिसत आहे. भांडण झाल्यानंतर पत्नी पलंगावरच विटांची भिंत उभी करते. तर पती घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे. पलंगाचा हा भाग माझा असून या भागात यायचं नाही असा त्याचा अर्थ निघतो. इतकंच नाही सिमेंट वापरून विटांची पक्की भिंत बांधताना पत्नी दिसत आहे. तर पती पत्नीच्या कृत्याने चिडलेला दिसतो, पण भीतीपोटी काहीच बोलत नाही. भांडणानंतर पत्नीने भिंत बांधण्याचा निर्णय घेतल्याचे व्हिडीओ पाहून कळते.

हा मजेदार व्हिडीओ rising.teching नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्स विविध प्रकारे कमेंट्स करत आहेत. व्हिडीओ पाहून एका यूजरने लिहिले की, ‘भिंत बांधण्याऐवजी दोघांनी एकाच वेळी बोलले पाहिजे.’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘पती-पत्नीमधील भांडणावर आधुनिक उपाय.’ लोक या व्हिडीओचा आनंद घेत वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Husband wife quarrel enraged lady builds brick wall on bed viral video rmt

ताज्या बातम्या