Viral video: चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज चोरीच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. सोन्याचे दागिने, रोख रक्कम, वाहने इत्यादी चोरी होणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे.चोरी ची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. आता जवळपास प्रत्येक रेस्टॉरंट, हॉटेल, कॅफे आणि बाजारातील कोणतेही दुकान. त्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही सुविधा असलेले कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी त्यात सर्व प्रकार कैद होतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चोराला माय-लेकींनी चांगलाच धडा शिकवला आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून माय-लेकींचं धाडस पाहून तुम्हीही अवाक् व्हाल…

तर झालं असं की, दुपारच्या सुमारास दारावरची बेल वाजली, यावेळी घरात तीन महिला होत्या. दरवाजात दोन तरुण पार्सल घेऊन आल्याचं त्यांनी घरातील मोलकरणीला सांगितले. यावेळी त्यांना बाहेर थांबण्यास सांगितले मात्र, दरवाजा उघडताच त्यातील एक जण बंदूक दाखवून घरात शिरला. आरोपी प्रेमचंद याने मोलकरणीच्या गळ्यावर चाकू ठेवला.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
robbing shopkeepers
दुकानदारांना लुटण्याचा हा नवीन प्रकार तुम्ही पाहिला आहे का? व्हिडीओ पाहा अन् सतर्क व्हा
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

त्यानंतर दोघांनी जबरदस्तीने घरात घुसून सर्व मौल्यवान वस्तू त्यांच्याकडे देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करणाऱ्या शूर आई-मुलीला मारहाण केली. मात्र माय-लेकींनी या चोरांना न घाबरता त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन लुटारूंपैकी एकाला पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. एक आरोपी प्रेमचंदला शेजाऱ्यांनी पकडले तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र त्यालाही पोलिसांनी पकडले. मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी ज्या घरी चोरीसाठी आले, त्याच घरी काही वर्षांपूर्वी काम करत होते. यावेळी दरोडेखोरांना त्या घरातील सोन्याच्या वस्तू आणि घरातील पैसे नेमके कुठे ठेवतात? याबाबत सगळी माहिती घेतल्यावर ते काम सोडून पळून गेले होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO…अन् ‘तो’ चक्क कुत्र्याला चावला; हल्ला करताच रागावलेल्या चिमुकल्यानं घेतला बदला, पण शेवट…

यावेळी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यानंतर पोलिसांनी या धाडसी माय-लेकिंचा सत्कार केला. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही या माय-लेकीच्या धाडसाचं कौतुक करत आहेत.