ऑगस्ट महिन्यामध्ये कन्नन गोपीनाथन या आयएएस अधिकाऱ्याने जम्मू काश्मीरमध्ये निर्बंध लादल्याने राजीनामा दिला होता. दादरा नगर हवेलीचे ऊर्जा, नगर विकास व कृषी सचिव असणाऱ्या कन्नन यांचा राजीनामा त्यावेळी चांगलाच चर्चेत आला होता. मात्र आता राजीनामा दिल्यानंतर कन्नन यांनी केलेल्या एका ट्विटमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या एका मजेशीर ट्विटमध्ये कन्नन यांनी चांगली वॉशिंगमशीन घेतल्याशिवाय सरकारी नोकरी सोडू नका असा सल्ला दिला आहे.

२०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असणाऱ्या कन्नन यांनी मला माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य परत द्या. माझ्या मनासारखं मला जगू द्या असं म्हणत जम्मू काश्मीरमधील निर्बंध लादण्याच्या निर्णयाला विरोध करत राजीनामा दिला होता. या घटनेला दोन महिन्यांहून अधिक काळा झाला आहे. दरम्यान आता कन्नन यांनी एक ट्विट केले आहे. ‘सरकारी अधिकारी म्हणून नोकरी सोडल्यानंतर मला सर्वात जास्त ज्या गोष्टीचे दु:ख झाले आहे ते म्हणजे प्रत्येक दौऱ्यानंतर कपडे मलाच धुवावे लागतात,’ असं आगळं-वेगळं दु:ख कन्नन यांनी ट्विट करुन व्यक्त केलं आहे. पुढे ते लिहीतात, ‘ज्यांना ज्यांना आयएएसची नोकरी सोडायची आहे त्यांना मी एकच सांगू शकतो वॉशिंग मशिन विकत घेईपर्यंत नोकरी सोडू नका. मी पुन्हा सांगतो वॉशिंग मशिन घेतल्याशिवाय नोकरी सोडू नका.’

कन्नन यांच्या या ट्विटवर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कर्म

कोणाला तरी शोधा

धोबीनाथ

सांगा…

भाजपा एक वॉशिंग मशीन

खराब कपडे चालतील पण…

मी करु का गिफ्ट

मोदी आणि शाह यांची लॉण्ड्री

काहीही…

गुजरातमधील पावडर वापरा

तुमच्या स्पिरीटसाठी

विनोदबुद्धी चांगली आहे

दरम्यान, कन्नन यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकमधील आयएएस अधिकारी एस. शशिकांत सेंथिल यांनी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. लोकशाहीच्या आधारस्तंभ असलेल्या संस्थांची अभूतपूर्व गळचेपी सुरू असल्याच्या आरोप करत सेंथिल यांनी राजीनामा देत असल्याचे म्हटलं होतं.