Viral video: माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते. आपल्यापैकी बरेच जगण्यासाठी आणि आरोग्य उत्तम राखण्यासाठी जेवण करता.मात्र जगात काही असेही लोक आहेत जे खूप विचित्र विचित्र पदार्थ बनवतात आणि खातातही. लोक वेगवेगळ्या सोशल मीडिया साईटवर हे विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर करत असतात. या विचित्र पदार्थांना लोक फ्यूजन फूड असेही म्हणतात.यामध्ये काही प्रयोग यशस्वी होतात पण काही एवढे विचित्र होतात की, अगदी नको वाटतं. नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थांचं पूर्ण रूप पालटून टाकतात. अशातच एक विचित्र फूड कॉम्बिनेशन्सबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांची चव चाखण्याचा विचार तुम्ही कदाचित स्वप्नातही करू शकणार नाही.

आतापर्यंत तुम्ही साऊथ इंडियन स्पेशल डीश इडली सांभार खाल्लाच असेल. अनेकांना ही डीश फार आवडते. मात्र तुम्हाला जर इडली-सांबर आईस्क्रीम दिली तर ? हो एका  विक्रेत्यानं चक्क इडली-सांबर वाली आईस्क्रीम बनवली आहे. हे दृश्य पाहूनच फूडी लोकांचा संताप होतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, विक्रेता सुरुवातीला एक इडली घेतो, त्यावर चटणी, सांभार आणि शेवटी आईस्क्रीम टाकतो. यानंतर हे सगळं तो एकत्र करतो आणि याचा आईस्क्रीम रोल तयार करतो. आता तुम्हीच सांगा तुम्हाला आवडेल का खायला ही आईस्क्रीम?

loksatta Health Special article, nutrition, food, pregnancy period
Health Special: गरोदरपणात किती खावं? काय खावं?
How To Made Homemade Crispy Potato Wafers
१ किलो बटाटे वापरून घरच्याघरी बनवा खमंग ‘बटाटा वेफर्स’; ३ वर्ष खराब होणार नाहीत
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
tiger jumps 20 feet to cross river vide
वाघ की रॉकेट? वाघाच्या उडीची सोशल मीडियावर एकच चर्चा…सुंदरबनमधील VIDEO व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तरुणाने चक्क गौतमी पाटीलची ऑफर रिजेक्ट केली? VIDEO बघून कळेल नेमकं प्रकरण काय…

या व्हिडिओवर अनेक नेटिजन कमेंट करत आहेत काही जणांनी तर या नवीन फ्यूजन फूड डिश वर संताप देखील व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ foodb_unk या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.  यापेक्षा उपाशी राहिलेलं बरं अशा काही संतापजनक प्रतिक्रिया नेटीझन्सनी यावर व्यक्त केल्या आहेत. काहीही करता येतं म्हणून ते करायचं असं नाही असंही एकाने म्हटले आहे. तर एकाने आणखी काय काय पाहायला लावणार आहेत असं म्हणत अशाप्रकारच्या प्रयोगांबद्दल नाराजी दर्शवली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही दोन्ही पदार्थांची अशा पद्धतीने वाट लावल्यामुळे राग आल्याशिवाय राहणार नाही.