Viral Video : परिसरामध्ये स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे. घाण आणि दुषित पदार्थांमुळे आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी आपल्या आजुबाजूचा परीसर स्वच्छ ठेवणे, गरजेचे आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क वन अधिकाऱ्याने त्याच्या टीमसह जंगल स्वच्छ केले आणि जवळपास दोन ट्रक प्लास्टिक जमा केले. हा व्हिडीओ पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. या वन अधिकाऱ्याचे नाव आहे परवीन कासवान.
परवीन कासवान हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत येतात. कधी त्यांची सक्सेस स्टोरी चर्चेत येते तर कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होतात. आता त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ एका जंगलातील आहे. या व्हिडिओमध्ये वन अधिकारी परवीन कासवान त्यांच्या टीमसह दिसत आहे. ते आणि त्यांची टीम कचरा हातात ग्लोव्स घालून कचरा उचलताना दिसत आहे. संपूर्ण टीम जंगल स्वच्छ करताना दिसत आहे. जवळ पास दोन ट्रक प्लास्टिक त्यांनी गोळा केले आहे. त्यांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Parveen Kaswan, IFS या एक्स अकाउंटवरुन त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्लॉगिंग – जेव्हा तुम्ही चालता किंवा जॉगिंग करता आणि त्याचबरोबर कचरा गोळा करता. आज आम्ही ७ किमी चालत जंगलाच्या रोडवरील प्लास्टिक गोळा केले. दोन ट्रक प्लास्टिक जमा केले. जंगलाच प्राण्यांप्रमाणे वागा. अस्वच्छता करू नका. तुम्ही केव्हा प्लॉगिंग करताय?”

UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती
Viral video of a rat in trains AC coach Woman shares video on social media Railways responds
Video : बापरे! रेल्वेच्या एसी डब्यात फिरत होता चक्क उंदीर, महिलेने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

त्यांच्या या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप छान पुढाकार घेतला सर” तर एका युजरने लिहिलेय, “आम्हांला आनंद आहे की, निसर्गाचे संरक्षण करणारे अधिकारी म्हणून तुम्ही आमच्याकडे आहात” आणखी एका युजरने लिहिलेय, “छान काम करताहेत सर. हे एका चांगल्या लीडरचे वैशिष्ट्य आहे जे तुम्ही खरोखर आहात!” अनेक लोकांना परवीन कासवान यांचे हे काम खूप आवडले आहे.