अलीकडच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर सर्वत्र वाढला आहे. डिजिटल ॲपच्या मदतीने कुठेही आणि कधीही सहज पेमेंट करता येते. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर पैसे पाठवणे व रिसिव्ह करणे शक्य होते. त्यामुळे ग्राहकदेखील या ॲप्लिकेशनला पसंती दाखवताना दिसतात. पण, आज सोशल मीडियावर काही तरी वेगळंच पाहायला मिळालं आहे. एका रिक्षाचालकाने चक्क ऑनलाइन पैसे स्वीकारले जाणार नाहीत, असा बोर्ड रिक्षात लावून घेतला आहे.

रिक्षाचालक किंवा ग्राहकांकडे अनेकदा सुट्टे पैसे नसतात, त्यामुळे काही रिक्षाचालक ‘गूगल पे’ (Google Pay) चा क्यूआर कोड रिक्षात लावून ठेवतात, जेणे करून ग्राहकांना सोयीस्कर जाईल. पण, चेन्नईतील या रिक्षाचालकाने रिक्षात एक कागदाचे पोस्टर चिकटवले आहे. त्यावर असे लिहिण्यात आले आहे की, ‘गूगल पे व्यवहार स्वीकारला जाणार नाही आणि ATM मधून पैसे काढण्यासाठी कुठेही रिक्षा थांबवली जाणार नाही…’ एकदा पाहाच मजेशीर पोस्ट.

Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल
Helper wanted in momo shop salary
मोमोच्या दुकानात हवाय मदतनीस, जाहिरात होतेय व्हायरल, पगाराचा आकडा पाहून प्रत्येकाला हवी आहे ही नोकरी
aditi sarangdhar shares private ride bad experience
Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…
Passenger shares video of Kashi Express’s overcrowded coach.
” ना एसी, ना अन्न, ना पाणी, वॉशरूममध्ये जाण्यासाठी…..!”, गर्दीने खचाखच भरलेल्या काशी एक्सप्रेसचा Video Viral

हेही वाचा…रोज मद्य सेवन करणाऱ्या जगातील सर्वांत वृद्ध व्यक्तीचे निधन; ‘त्यांचे’ कुटुंब पाहिलेत का?

पोस्ट नक्की बघा…

चेन्नईच्या मेट्रोपॉलिटन शहरातील या रिक्षाचालकाच्या रिक्षातून एक अज्ञात व्यक्ती प्रवास करीत होती. या दरम्यान रिक्षात बसल्यावर या व्यक्तीने हे कागदाचे पोस्टर पाहिले. पोस्टर पाहून त्यालाही नवल वाटले आणि ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर करण्याचे त्याने ठरवले. अनेकदा ऑनलाइन पेमेंट करताना नेटवर्कमुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. बहुदा त्यामुळेच रिक्षाचालकाने हा निर्णय घेतला असावा, असे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर ही पोस्ट @bcbilliofficial या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट पाहून एका युजरने मजेशीर कमेंट केली आहे की, ‘जर गूगल पे आणि एटीएम चालणार नाही, मग रिक्षाचालक ग्राहकांना फ्री सर्व्हिस देणार का?’, तर दुसरा युजर म्हणतोय की, ‘ रिक्षाचालकाने जे आहे ते स्पष्ट सांगितलेलं दिसत आहे’; अशा अनेक कमेंट नेटकरी करताना दिसून आले आहेत.