अमेरिकेतील कन्सास शहरात गेल्या आठवड्यात श्रीनिवास कुचीभोतला या भारतीय तरूणाची वर्णविद्वेषातून निर्घृण हत्या झाली होती. हे प्रकरण ताजे असताना अमेरिकेतल्या न्यूयॉर्क येथील भारतीय वंशाच्या एका तरूणीला देखील ट्रेनमध्ये वर्णद्वेषाचा सामाना करावा लागला आहे. याचा व्हिडिओ देखील तिने फेसबुकवर शेअर केला आहे. वर्णद्वेषातून एका सहप्रावाश्याने तिला शिवीगाळ करत ‘तुम्ही जिथून आला आहात तिथे परत जा’ अशा धमक्या देत असभ्य वर्तन केले. एकता देसाई या तरुणीच्या फेसबुक अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यात त्या व्यक्तीने तिच्या शेजारी बसलेल्या आणखी एका महिलेला देखील अशाच धमक्या दिल्याचे तिने म्हटले आहे.

VIDEO: सात वर्षांच्या मुलाचं डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणाला आव्हान

अमेरिकेत आता भारतीयांना देखील वर्णद्वेषाचा समाना करावा लागत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत आहे. श्रीनिवास कुचीभोतला या भारतीय तरूणाची वर्णविद्वेषातून कन्सास शहरात हत्या करण्यात आली. गार्मिन या कंपनीच्या मुख्यालयात जीपीएस निर्माता म्हणून काम करणारा अभियंता श्रीनिवास त्याचा सहकारी आलोक मदासानी याच्याबरोबर ओलेद येथील ऑस्टिन्स बार अ‍ॅण्ड ग्रील या बारमध्ये फुटबॉलचा सामना पाहात होते. त्याच बारमध्ये अ‍ॅडम पुरिन्टन (५१) हा अमेरिकी नौदलातून निवृत्त झालेला सैनिकही बसला होता. अ‍ॅडमने श्रीनिवास आणि आलोक यांच्याशी वाद उकरून काढला आणि त्यांच्यावर गोळी झाडली. यात श्रीनिवास याचा मृत्यू झाला. ‘तुम्ही दहशतवादी आहात. माझ्या देशातून चालते व्हा’, असेही गोळी झाडण्यापूर्वी हल्लेखोराने म्हटले होते. हे प्रकरण ताजे असतानाच, न्यूयॉर्क येथे राहाणा-या एकता देसाई या तरूणीने देखील आपल्या फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ट्रेनमधून प्रवास करताना एका व्यक्तीने तिला अमेरिकेतून चालते व्हा सांगत शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी असभ्य वर्तन देखील केले.

VIRAL : असे काय घडले की भिकाऱ्याने देऊ केली आपली कमाई

आश्चर्य म्हणजे यावेळी अनेक सहप्रवासी मात्र हा सारा प्रकार हाताची घडी घालून बघत होते. एकतालाच नाही तिच्या शेजारी बसलेल्या एका आशियायी महिलेला देखील त्याने शिविगाळ केला. पण या व्हिडिओमध्ये दिसणा-या तरुणाने मात्र सावध पवित्रा घेत आपण फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केला अशी सारवासारव केली आहे. या प्रकराबद्दल तिने तातडीने पोलिसांकडे तक्रार केली. पण पोलिसांनी या तरुणाला पकडले की नाही हे मात्र तिला समजले नाही.