तृतीयपंथी म्हटले की आजही अनेकांच्या भुवया काहीशा उंचावतात. भीक मागून त्रास देणारे आणि पैसे नाही दिले तर चिडचिड करणाऱ्या व्यक्ती अशी आपल्या मनात त्यांच्याबद्दलची प्रतिमा असते. मात्र, दिवसागणिक या परिस्थितीत फरक पडत आहे. तृतीयपंथी त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच प्रत्यय नुकताच कोलकातामध्ये आला. या ठिकाणी चक्क एक तृतीयपंथी न्यायाधीश झाल्या आहेत. जोयिता मोंडल असे या त्यांचे नाव असून समाजापुढे एक उत्तम आदर्श जोयिता यांनी निर्माण केला आहे. २९ वर्षांच्या जोयिता यांनी जुलै महिन्यात न्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्या सध्या उत्तर दिनाजपूर येथील इस्लामपूर न्यायालयाच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ‘विद्वान न्यायाधीश’ पदावर कार्यरत आहेत.

त्यांच्या लिंगाबाबत स्पष्टता नसल्याने त्यांना १० वी मध्ये शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतरचा त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. मात्र, तृतीयपंथी व्यक्ती न्यायाधीश होण्याची गोष्ट भारतीयांच्या दृष्टीने अतिशय अभिमानेची बाब आहे. जोयिता यांनी अतिशय जिद्दीने परिस्थितीवर मात करत आपले ध्येय गाठले आहे. उदरनिर्वाहासाठी भीक मागत असतानाच त्यांनी बरेच सामाजिक कामही केले आणि त्याच परिस्थितीत आपले शिक्षणही उत्तम पद्धतीने पूर्ण केले.

EX Jharkhand CM Hemant Soren Moves sc for bail
हेमंत सोरेन यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; अटकेविरुद्धच्या याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नसल्याचा आरोप 
mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Supreme court Justince Bhushan Gavai
“सरकार आणि कार्यकारी मंडळ अपयशी ठरत असताना…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मोठे विधान

कोलकातामध्ये होणाऱ्या भेदभावाला कंटाळून त्यांनी आपले शहर सोडले आणि त्या उत्तर दिनाजपुर जिल्ह्यातील इस्लामपूर येथे स्थायिक झाल्या. तृतीयपंथींच्या हक्कांसाठी आणि त्यांच्याबाबत होणाऱ्या भेदभावासाठी जोयितो यांनी लढा दिला. काही वर्षांपूर्वी जोयिता यांनी समाजातील वेगवेगळ्या समस्यांनी ग्रासलेल्या लोकांसाठी स्वतःची एक संस्थाही चालू केली. हे करत असतानाच त्यांनी मुक्त विद्यापीठातून कायद्याचे शिक्षणही पूर्ण केले. २०१० मध्ये आपल्या जिल्ह्यात मतदान कार्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या तृतीयपंथी होत्या.

तृतीयपंथी असल्याने हॉटेलमध्ये प्रवेश नाकारलेल्या जोयिता न्यायालयाजवळील एका बसस्टॉपवर झोपायच्या. त्याच न्यायालयात त्या आता न्यायाधीश म्हणून काम करत आहेत. अशाप्आरकारे उच्चपदावर काम करणे  ही अतिशय आनंदाची घटना असल्याचे त्या म्हणतात. आपल्या वाट्याला आलेले जीवन इतर तृतीयपंथी लोकांच्या वाट्याला येऊ नये असे त्यांना वाटते. त्या म्हणतात, न्यायाधीश म्हणून माझी झालेली निवड ही लिंगभेद करणाऱ्या समाजाला मिळालेली चपराक आणि संदेशही आहे. तृतीयपंथी समाजातील २ ते ३ टक्के लोकांनाही नोकऱ्या मिळवून देता आल्या तर मला माझ्या पदाबद्दल समाधान वाटेल असेही त्या म्हणाल्या.