Anand Mahindra share Fast Restaurants: उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ते नेहमीच तरुणांना प्रेरित करत असतात. एकीकडे बेरोजगारी, तरुणांची नोकऱ्यांसाठीची धडपड आणि बाहेरची स्पर्धा यात तरुणाई भरडली आहे. मात्र आता तरुणांनो टेन्शन घेऊ नका. मुंबई-पुण्यातील तरुणांसाठी आनंद महिंद्रांनी एक नवी बिझनेस आयडीया शेअर केली आहे. या बिझनेस मॉडेलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारतामध्ये दिवसागणिक हॉटेल व्यवसायात वाढ होत आहे. त्यात पर्यटन व हॉटेल व्यवसाय एकत्रित आपल्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक बनला आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यावसायीक नव नवीन कल्पना शोधून त्या ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतात. आनंद महिंद्रा यांनीही एका मोबाईल हॉटेलचा व्हिडीओ शेअर केलाय. मोबाईल हॉटेल म्हणजे चालतं फिरतं हॉटेल. हे हॉटेल तुम्ही कधीही कुठेही नेऊ शकता. एक प्रकारे फूड ट्रकचं अपग्रेडेट वर्जन म्हटलं वावगं ठरणार नाही. म्हणजे एक बटण दाबलं की काही मिनिटांत अख्खं हॉटेल तयार होतं. फूड ट्रकमध्ये केवळ अन्न-पदार्थ मिळतात. हे पदार्थ तुम्हाला ट्रकच्या शेजारी उभं राहूनच खावे लागतात. बसण्यासाठी विशेष अशी जागा नसते. पण ही अडचण या मोबाईल हॉटेलनं पूर्ण केली. या हॉटेलमध्ये तुम्ही व्यवस्थीत बसून आपल्या आवडत्या पदार्थांचा आनंद घेऊ शकता.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित
pune, srinivasan services trust, sparrow conservation campaign
या चिमण्यांनो परत फिरा…! शेकडो गावातील गावकरी घालताहेत साद

व्हिडीओमध्ये पाहू शकता की,कंटनेर आपोआप उघडतो आणि एका रेस्टॉरंटमध्ये त्याचे रुपांतर होते. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दिसत आहे जो रेस्टारंट उघडताना दिसत आहे. रेस्टारंट पूर्ण उघल्यानंतर कोणालाही वाटणार नाही काही वेळापूर्वी हा एक कंटेनर होता.हे पदार्थ तुम्हाला ट्रकच्या शेजारी उभं राहूनच खावे लागतात. बसण्यासाठी विशेष अशी जागा नसते. पण ही अडचण या मोबाईल हॉटेलनं पूर्ण केली. या हॉटेलमध्ये तुम्ही व्यवस्थीत बसून आपल्या आवडत्या पदार्थांचा आनंद घेऊ शकता

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना सावधान! क्षणार्धात भयंकर घडलं; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद

“फास्ट फूड. फूड ट्रक्स. आणि आता फास्ट रेस्टॉरंट्स. एक नवीन बिझनेस मॉडेल.” असं कॅप्शन देत आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३२.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच व्हिडीओवर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.