Indian Railway Seat struggle saga: ट्रेनमधून लांब पल्ल्याचा प्रवास करताना खूप गर्दी असेल, तर अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात काही वेळा रिझर्व्ह सीट असतानाही प्रवाशांना बसण्यासाठी जागा दिली जात नाही. इतर अनारक्षित तिकिटावर प्रवास करणारे प्रवासी दमदाटी करून किंवा भांडून रिझर्व्ह सीट हडप करतात. अशा वेळी रिझर्व्ह तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. १८ फेब्रुवारी रोजी YNRK-HWH एक्स्प्रेसने (Yog Nagari Rishikesh HOWRAH JN SPECIAL) प्रवास करणाऱ्या एका महिलेला अशाच प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागला. त्यानंतर तिने तिच्या भावाच्या मदतीने ट्विटरद्वारे रेल्वे प्रशासनाकडून मदत मागितली; जी मदत तिला काही मिनिटांत मिळाली. दरम्यान, या घटनेसंबंधित एक पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित महिला प्रवाशाकडे ट्रेनमधील सीटची रिझर्व्ह तिकीट होती; मात्र काही प्रवाशांनी तिची सीट अडवली आणि तिथून उठण्यास नकार दिला. ती महिला एकटीच प्रवास करीत होती. यावेळी संबंधित महिलेने तिच्या भावाला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने ट्विटरवर एक पोस्ट करीत रेल्वे प्रशासनाला घडलेला प्रकार सांगितला. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच भारतीय रेल्वे प्रशासनाने युजरला मदत केली.

Hyderabad Woman, Daughter Fight Off Armed Robbers Who Entered Their Home
VIDEO: धाडसाला सलाम! माय-लेकी चोरांना भिडल्या; चाकूधारी दरोडेखोराला केलं सळो की पळो
indian railways completely digital from 1 april payment can be online for parking ticket fine
ट्रेनमधून विना तिकीट प्रवास करताना पकडला गेला तर…; १ एप्रिलपासून रेल्वेच्या सुविधेत मोठा बदल
scared Milind Gunaji met Amitabh Bachchan
बिग बींबरोबरचा चित्रपट नाकारल्यावर घाबरलेले मिलिंद गुणाजी, त्यांना भेटायला गेले अन्…; म्हणाले, “माझं स्पष्टीकरण ऐकून…”
desi jugaad video man used amazing trick to earn money video goes viral on social media
पैसे कमावण्यासाठी भन्नाट जुगाड; महामार्गावरील रस्तादुभाजकाला लावल्या शिड्या अन्… पाहा video

पोस्टमध्ये त्याने लिहिले की, संबंधित ट्रेनच्या स्लीपर कोचमध्ये त्याच्या बहिणीची कन्फर्म तिकीट असतानाही काही प्रवाशांनी तिची सीट अडवली आणि नंतर ती सीट रिकामी करून देण्यास नकार दिला. त्याने पुढे लिहिले की, त्याची धाकटी बहीण पहिल्यांदाच ट्रेनमधून प्रवास करीत होती. कसेबसे शेवटच्या क्षणी तिला कन्फर्म तिकीट मिळाले. ट्रेन तीन तास उशिरा पोहोचली. यावेळी ट्रेन येताच ती चढून तिच्या कन्फर्म सीटजवळ गेली तेव्हा तिथे जागा रिकामी नव्हती. तिथे एक काका आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब बसले होते. यावेळी तिने त्यांना तिची सीट देण्यास सांगितले; ज्यावर ते काका तिच्यावर ओरडून बोलू लागले. तिची बहीण एकटीच प्रवास करीत होती.

आपल्या बहिणीची कहाणी सांगताना युजरने सांगितले, “माझी धाकटी बहीण पहिल्यांदाच ट्रेनमधून एकटी प्रवास करीत आहे. कसेबसे शेवटच्या क्षणी आमचे तिकीट कन्फर्म झाले आणि ट्रेन तीन तास ​​उशिरा पोहोचली. ती तिच्या सीटवर गेली आणि ती जागा रिकामी नव्हती, तिथे एक काका त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह बसले होते. त्यांनी त्यांना तिथून उठायला सांगितल्यावर ग्यान काका त्यांना ओरडायला लागले. माझी बहीण एकटीच प्रवास करीत आहे.”

“उद्या बहिणीला प्रॅक्टिकल परीक्षेला जायचे आहे आणि त्यात तिची तब्येत बरी नाही. पण, त्या काकांनी तिला इतर तीन प्रवाशांसह वरच्या बर्थवर बसायला सांगितले आणि सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे मी इथून काहीही करू शकत नाही. आता मला खूप काळजी वाटतेय. मी त्यासाठी काही करू शकतो का? अशी काही सुविधा उपलब्ध आहे का?”

यावर त्याने पुढे सांगितले, “त्याच्या बहिणीकडे कन्फर्म तिकीट असूनही ट्रेनमध्ये तिला बसायला जागा मिळाली नाही आणि काही लोक, जे विनातिकीट प्रवास करीत होते, ते जाऊन त्याच्य बहिणीच्या सीटवर बसले. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होताच, भारतीय रेल्वेने तात्काळ त्या तरुणीला मदत केली आणि २० मिनिटांनंतर तिला तिची सीट मिळवून दिली.