scorecardresearch

VIRAL VIDEO: भारीच ना! आता ‘मनिके मागे हिथे’ गाण्याचं काश्मिरी व्हर्जन होतंय व्हायरल

बॉलीवूड स्टार्ससह सर्वांच्याच पसंतीस पडलेलं ‘मनिके मागे हिथे’ हे लोकप्रिय गाणं तुम्हाला आतापर्यंत माहिती पडलं असेलच. या गाण्याचे वेगवेगळे व्हर्जन तुम्ही ऐकले असतील, त्यानंतर आता काश्मिरी व्हर्जन सध्या प्रचंड व्हायरल होतंय. एकदा पाहा हा व्हिडीओ.

kashmiri-version-of-manike-mage-hithe
(Photo: Instagram/ iamranihazarika)

बॉलीवूड स्टार्ससह सर्वांच्याच पसंतीस पडलेलं ‘मनिके मागे हिथे’ हे लोकप्रिय गाणं तुम्हाला आतापर्यंत माहिती पडलं असेलच. इंटरनेटवर हे गाणं एखाद्या जंगलातल्या आगीसारखं पसरलंय. जर तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही तुमच्या इन्स्टाग्रामवर रील पाहत असताना कोणत्यातरी एका रिलमध्ये तरी हे गाणं तुम्ही ऐकलं असेलंच. मनिके मागे हिथे हे गाणं दाक्षिणात्य भाषेतलं वाटत असलं तरी ते कुठल्याही भारतीय भाषेतलं नाही. ते आहे श्रीलंकन गाणं…. सिंहली भाषेतलं. पण आजा या गाण्याचे वेगवेगळे व्हर्जन पहायला मिळतात आहे. त्यात आता काश्मिर व्हर्जनची भर पडलीय. मुळ श्रीलंकन भाषेतलं हे गाणं काश्मिरी व्हर्जनमध्ये नक्की कसं असेल, हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

सोशल मीडियावर सध्या काश्मिरी व्हर्जनमधल्या ‘मनिके मागे हिथे’ या गाण्याची प्रचंड चर्चा सुरूये. या व्हायरल व्हिडीओमध्ये बॉलिवूड गायिका राणी हजारिका दिसू येतेय. काश्मिरी पारंपारिक पोशाख परिधान करून गायिका राणी हजारिका ही ट्रेंडीग सॉंग ‘मणिके मागे हिथे’चं काश्मिरी व्हर्जन सॉंग गाताना दिसून येतेय. या ट्रॅकच्या काश्मिरी व्हर्जनला ‘म्यां यारा’ असं नाव दिलंय आणि राणीने ते अगदी अचूकपणे गायलंय. तिने हे गाणं अगदी मनापासून गायलंय आणि तिच्या मधुर आवाजाने सोशल मीडियावर या गाण्याला आणखी चर्चेत येण्यासाठी नवं कारण दिलंय.

गायिका राणीने हे काश्मिरी व्हर्जन सॉंग तिच्या इन्स्टाग्राम रील्सवर अपलोड केलंय. त्यानंतर हे सॉंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलंय. सध्या याच गाण्याची तमीळ, मल्याळी, तेलुगू आणि हिंदी व्हर्जन्स सोशल मीडियावर पहायला मिळाली. त्यानंतर आता काश्मिरी व्हर्जनने सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यास सुरूवात केलीय. AR Music Studios नावाच्या युट्यूब चॅनवर हे काश्मिरी व्हर्जन अपलोड करण्यात आलंय. या काश्मिर व्हर्जनने इन्स्टाग्रामवर केवळ तीन दिवसांतच १ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले आहेत. तर १० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हर्जनला लाइक केलंय.

आतापर्यंत या गाण्याच्या वेगवेगळ्या व्हर्जननंतर काश्मिरी व्हर्जनला सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळतोय. या व्हर्जनमधील गाण्याचे बोल सुद्धा नेटिझन्सना खूप भावले आहेत. या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटिझन्स राणी हजारिका हिचं कौतुक करताना दिसू येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2021 at 13:08 IST

संबंधित बातम्या