बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकींची जोरदार तयारी सुरु आहे. प्रचारसभा आरोप प्रत्यारोपांच्या फैरींबरोबरच मतदारराजाचे मत जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सध्या राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये फिरताना दिसत आहे. मात्र अशाच एका प्रतिनिधिला अगदी आश्चर्यकारक अनुभव लखीसरायमध्ये आला. या पत्रकाराने एका स्थानिक वृद्धाला विकास आला का असा प्रश्न विचारला. म्हणजेच सध्याचे सत्ताधारी सरकार आल्यानंतर तुमच्या परिसराचा विकास झाला का असं या पत्रकाराला विचारायचे होते. मात्र पत्रकाराच्या या प्रश्नाला आजोबांनी असं काही उत्तर दिलं ती त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा सर्व प्रकार बिहार तकच्या पत्रकाराबरोबर घडला असून सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय आहे.

पत्रकाराने आजोबांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना, “तुमच्या गावामध्ये विकास पोहचला आहे का?” असा प्रश्न विचारला. मात्र या प्रश्नामुळे गोंधळलेल्या आजोबांनी विकास एखादी व्यक्ती असल्याप्रमाणे उत्तर दिलं. “विकास? मी (तेव्हा) नव्हतो इथे. आजारी होतो. डॉक्टरकडे गेलो होतो,” असं उत्तर या आजोबांनी दिलं.

अर्थात आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर मजेदार कमेंट आल्या आहेत हे वेगळं सांगण्याची गजर नाही. अगदी आजोबांच्या साधेपणापासून ते विकास आमच्याकडेही आला नाहीपर्यंतचे अनेक कमेंट या पोस्टवर आल्या आहेत. त्यापैकी काही निवडक खालीलप्रमाणे…

१)

२)

३)

४)

५)

६)

बिहारमध्ये विधानसभेसाठी २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.