श्वानाची स्वामीनिष्ठा…मदत मिळेपर्यंत जखमी मालकाला घट्ट मिठी मारून बसला

मैत्रिचे उत्तम उदाहरण

(छाया सौजन्य : डेलीमेल )

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे आणि वेळोवेळी हा प्राणी आपली इमानदारी सिद्ध करतो, धन्यासाठी आपले प्राणही द्यायला तो मागे पुढे पाहत नाही. अशी शेकडो उदाहरणं आपल्या समोर असतील. आताही तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला कुत्रा आणि मालकाचा फोटो पाहिला असेल. डोक्यावर झाडं कोसळून त्याच्या मालकाचा अपघात झाला होता. हाडं मोडल्याने त्याला उठताही येतं नव्हतं तेव्हा हा कुत्रा मदत मिळेपर्यंत आपल्या मालकाला मिठी मारून तासन् तास त्याच्या शेजारी बसून होता.

अर्जेंटिनामधला हा फोटो आहे. या कुत्र्याचा मालक झाडांना पाणी घालत असताना झाडांची मोठी फांदी त्याच्या डोक्यावर कोसळली आणि अपघात झाला. या अपघातामुळे त्याला काहीच हालचाल करता येईना त्यामुळे पुढचे काही तास तो जमिनीवर निपचित पडून होता. अशा वेळी त्याचा पाळीव कुत्रा टोनी वैद्यकीय मदत येईपर्यंत त्याला मिठी मारून त्याच्या शेजारी बसून होता. सुदैवाने जिजसच्या शेजारच्यांनी जिजसला पाहिले आणि वेळीच मदत बोलावली नाहीतर जिजसला आपले प्राण गमवावे लागले असते. जिजसला रुग्णवाहिकेतून नेताना देखील टोनीने त्याची साथ सोडली नाही. रुग्णवाहिकेतून नेतानाही जिजसची काळजी करत टोनी मागे मागे धावत होता. एका कर्मचाऱ्याने हा फोटो काढला आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत आहे. कुत्रा आणि माणसांच्या निखळ मैत्रिचे उत्तम उदाहरण म्हणजे हा फोटो होय!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loyal dog stays by side to his injured owner

ताज्या बातम्या