MS Dhoni Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आयपीएल सुरू होताच धोनीची क्रेझ पुन्हा एकदा झपाट्याने वाढली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठे रेकॉर्ड केले आहेत. सोशल मीडिया आणि इन्स्टाग्राम रील्समुळे धोनी नेहमी ट्रेंडमध्ये राहतो. महेंद्रसिंह धोनीच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओला युजर्स लाइक करतात. नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ‘कॅप्टन कूल’ धोनी फ्लाइटमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील धोनीच्या साधेपणाने चाहत्यांची मने पुन्हा एकदा जिंकली आहेत.

भारताचा महान क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना वेड लावले आहे. महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यामध्ये तो फ्लाइटच्या इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसत आहे. त्याला इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून लोक त्याची स्तुती करणारी गाणी गात आहेत. व्हिडीओमध्ये तो आपले सामान स्वतःकडे ठेवत असल्याचेही दिसत आहे. त्याचा साधेपणा पाहून लोक त्याच्यावर खूप खूश दिसले आहेत.

(हे ही वाचा : रेल्वे प्रशासनाच्या नियमांचे तीन-तेरा! एसी कोचमधील संतापलेल्या प्रवाशाने थेट रेल्वेलाच टॅग करत ‘असा’ व्हिडीओ केला शेअर )

जगभरात असे अनेक खेळाडू आहेत की, जे लक्झरी लाइफस्टाईल जगतात आणि प्रवासासाठी खासगी जेट किंवा विमानाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करतात. पण चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी अत्यंत साधेपणाने जीवन जगतो. धोनीच्या सरळ आणि साधेपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. धोनी फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना दिसला. धोनीला इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करताना पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं.

धोनीने साधेपणाने जिंकली सर्वांची मने

महेंद्रसिंह धोनी फ्लाइटमध्ये स्वतःचे सामान ठेवत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. वस्तू ठेवल्यानंतर तो आपल्या सीटवर बसतो. त्यानंतर लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात माहीचे स्वागत केले. धोनीचा हा साधेपणा पाहून लोकांनी व्हिडीओवर कमेंट करीत लिहिले, “एकच तर हृदय आहे, आणखी तुम्ही किती वेळा जिंकाल.” त्याच वेळी इतर काही लोकांनी “धोनी हा आजची सर्वांत महान व्यक्ती आहे आणि लोक त्याच्यावर खूप प्रेम करतात”, असे म्हटले आहे.

येथे पाहा व्हिडीओ

रांचीत मतदान केंद्रावर धोनीसह फोटो घेण्याची स्पर्धा

या आयपीएलमध्ये धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ आरसीबीकडून पराभूत होऊन ‘प्ले ऑफ’मधून बाहेर पडला होता. सामना हरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एम. एस. धोनी पत्नीसोबत बेंगळुरू विमानतळावर दिसला. तेथून धोनी कुटुंबासह रांचीला रवाना झाला. त्यानंतर शनिवारी तो रांचीमध्ये मतदान करताना दिसला. येथे धोनी संपूर्ण कुटुंबासह मतदान केंद्रावर पोहोचला. धोनी मतदान केंद्रावर पोहोचताच लोकांनी त्याला घेरले आणि त्याच्यासोबत तेथे फोटो क्लिक करण्याची जणू स्पर्धा लागली होती.