Premium

रेल्वे प्लॅटफॉर्म सायकल उलटी पलटी करत केला जबरदस्त स्टंट, श्वास रोखून पाहत राहिले प्रवासी; Viral Video एकदा पाहाच

व्यक्तीने सायकलवर दाखवला आगळा वेगळा स्टंट, कौशल्य पाहून लोकांनी केले कौतूक

Man stunt on bicycle at railway plhaltform Instagram Viral video
व्यक्तीने सायकलवर केला जबरदस्त स्टंट, पाहताना डोळ्यांवर विश्वास बसणार नाही (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम_rahul.ofc )

Man stunt bicycle: एकापेक्षा एक जबरसदस्त स्ंटट करणारे अनेक लोक जगात आहे जे आपल्या कौशल्य आणि साहसाच्या जोरावर अनेकांचे मन जिंकून घेतात. काही स्ंटट असे असतात जे पाहून आपण थक्क होतो तर काही स्टंट असे असतात की जे आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. नुकताच असा एक थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका सायकलस्वाराचा स्टंट लोक थक्क होऊन पाहत आहेत. त्या व्यक्तीचे टॅलेंट पाहून लोक त्याचे कौतूक करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

सायकलवर स्ंटट करून व्यक्तीने दाखवली अप्रतिम कला
व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती रेल्वे प्लॅटफॉर्मवर सायकल चालवताना दिसत आहे, पण पुढच्याच क्षणात तो सायकलवर एक अ‍ॅक्रोबॅटिक ट्रिक्स करून लोकांना आश्चर्यचकित करतो, जे पाहून तुमचाही क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसत नाही. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती सायकल उलटी-पलटी करत त्यासह फिरत आहे. पाहणाऱ्याचा एक क्षण काळाजाचा ठोका चुकतो कारण तो व्यक्ती रेल्वे टॅकच्या जवळ जातो आणि पडणार आहे असे वाटते पण तितक्यात कसबीने तो तोल सावरतो आणि पुन्हा सायकलवर बसतो. व्यक्तीचे कौशल्य शब्दात वर्णन करणे अवघड आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @_rahul.ofc नावाच्या अकाऊंटसह शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘शेवट चुकवू नका.’

हेही वाचा – दिल्लीमधून बिहारला फिरायला गेली महिला, Airtel ने पाठवले १ लाखाचे इंटरनॅशनल रोमिंग बिल; सर्व्हिसदेखील केली बंद

सायकलवर केला जबरदस्त स्टंट

४ दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला १ कोटींहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहणारे युजर्स त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देताना त्या व्यक्तीच्या कौशल्याचे कौतुक करताना थकत नाहीत. हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘या व्यक्तीच्या टॅलेंटला सलाम.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘खरी प्रतिभा अनेकदा रस्त्यावरच आढळते.’ तिसऱ्याने लिहिले, ‘सुपर.’ चौथ्याने लिहिले, ‘हा एक अतिशय आश्चर्यकारक स्टंट आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man stunt on bicycle at railway plhaltform instagram viral video snk

First published on: 10-12-2023 at 17:29 IST
Next Story
डाळीला तडका, उडाला भडका! थेट कार्यक्रमासाठी सजलेला मंडप जळाला; Video पाहून युजर्स म्हणाले…