scorecardresearch

VIRAL VIDEO : शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे; म्हणतात, “पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…”

या व्हिडीओवरून आता सोशल मीडियावरील नेटकरी मंडळींना चर्चेसाठी नवा विषय मिळाला आहे.

VIRAL VIDEO : शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे; म्हणतात, “पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…”
(Photo: Twitter/ANI)

राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य काही नवी नाही. एका शिक्षणमंत्र्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यामागे कारणही तसंच आहे. अनेक शिक्षणमंत्री शैक्षणिक कार्यक्रमात हजेरी लावून शिक्षणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात शिक्षणमंत्री चक्क दारू पिण्याच्या टिप्स लोकांसोबत शेअर करताना दिसून आले आहेत. याचा एक व्हिडीओ सध्या तेजीने व्हायरल होतोय. या व्हिडीओवरून आता सोशल मीडियावरील नेटकरी मंडळींना चर्चेसाठी नवा विषय मिळाला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ छत्तीसगडचा आहे. या व्हिडीओमध्ये छत्तीसगडचे शिक्षणमंत्री प्रेमसाई सिंग टेकम दिसून येत आहेत. हे मंत्री महोदय एका नशा मुक्तीवर आधारित एका कार्यक्रमात आले होते. यावेळी ते लोकांना दारू पिण्याचा फॉर्म्युला सांगिताना दिसून आले आहे. शिक्षणमंत्र्यांचा हा फॉर्म्युला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ग्लासमध्ये पाणी आणि अल्कोहोलचे प्रमाण असावे, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा : स्विमिंग पूलमध्ये बुडत होती आई, १० वर्षाच्या मुलाने असा वाचवला जीव, पाहा VIRAL VIDEO

“लोक दारू आणि त्याच्याशी संबंधित हानीबद्दल बोलतात, परंतु त्याच्याशी संबंधित अनेक फायद्यांबद्दल कोणीही बोलत नाही. तसंच जेव्हा आपण दारूबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला ते पिण्याची योग्य पद्धत लक्षात ठेवली पाहिजे. पाण्यामध्ये योग्य प्रमाणात दारू मिसळली जाते. यादरम्यान त्यांनी हरिवंशराय बच्चन यांची कविताही लोकांना सांगितली आहे.

आणखी वाचा : अ‍ॅमेझॉनचे शेकडो पॅकेज रेल्वे प्लॅटफॉर्मवर फेकून देऊ लागले, हा VIRAL VIDEO एकदा पाहा!

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, “रस्ता खराब आहे तिथे रस्ते अपघात होत नाहीत, तर जिथे रस्ते चांगले असतात, तिथे जास्त अपघात होतात.” रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल लोकांकडून फोन येतात, पण त्या रस्त्यांवर अपघात होत नाहीत. तर, खूप चांगले रस्ते असलेल्या ठिकाणी लोक जास्त वेगाने गाडी चालवतात आणि अपघात होतात, असं देखील ते म्हणाले.

आणखी वाचा : हे काय? मॉलमधून सामान चोरत होते आजी-आजोबा, अशी झाली पोलखोल आणि मग…, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : फ्लाइट अटेंडंटने रडणाऱ्या लहान मुलाला शांत केलं…बाळाचा गोंडस VIDEO VIRAL

शिक्षणमंत्र्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शिक्षणमंत्री असताना टेकम यांच्या या वक्तव्यावर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओवर शिक्षणमंत्र्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शाळकरी मुलांसमोर दारूचे फायदे सांगणाऱ्या या शिक्षणमंत्र्यांवर लोक मोठ्या प्रमाणात टिका करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Many benefits attached to alcohol chhattisgarh minister premsai singh tekam video viral formula of drinking alcohol it is getting gritty prp