पाठीवर दप्तर घेऊन सायकल चालवणाऱ्या माकडाचा हा VIRAL VIDEO पाहाच…; नेटकरी हसून लोटपोट

या व्हिडीओमध्ये एका माकडाने लहान मुलांप्रमाणे शाळेचा गणवेश परिधान करत पाठीवर छोटंस दप्तर घेत मस्ती करतोय. या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्ही पाहिलाय का हा व्हिडीओ?

monkey-bicycle-riding-video-viral
(Photo: Instagram/ helicopter_yatra_)

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, त्यापैकी प्राण्यांचे व्हिडीओ हे खास असतात. प्राण्याचे काही व्हिडीओ बघून खूप आश्चर्य देखील वाटतं. त्याचबरोबर काही व्हिडीओ असे असतात जे थेट हृदयाला स्पर्श करतात. पण कधी कधी असे अनेक व्हिडिओ आपल्या समोर येतात. ज्यांना पाहून आपल्याला हसू आवरत नाही.

अलीकडे असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका माकडाने शाळेचा गणवेश परिधान केलाय. अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलांप्रमाणेच या माकडाने सुद्धा त्याच्या पाठीवर छोटंस दप्तर घेतलं आहे. हा क्यूट माकड त्याच्या आकाराचीच छोटुश्या सायकलवर फिरताना दिसून येतोय. सायकलवरून रस्त्यावर गोल गोल घिरट्या मारत हा माकड खेळताना दिसून येतोय. त्यानंतर अगदी सहज सायकल थांबवत हा क्यूट माकड उडी मारत उतरतो आणि त्याची सायकल व्यवस्थित खाली रस्त्यावर टेकवतो. अगदी लहान मुलांप्रमाणे खेळणाऱ्या या माकडाला व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर छोटीसी स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा : VIDEO VIRAL : ससा आणि ट्रेनमध्ये रंगली शर्यत ? आयुष्याच्या शर्यतीत पाहा कुणी मारली बाजी…

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : तुम्ही कधी चार कान असलेली मांजर पाहिलीय का? VIRAL VIDEO पाहून तुम्ही हैराण व्हाल !

या क्यूट माकडाचा व्हिडीओ helicopter_yatra_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा मजेदार व्हिडिओ लोकांना खूप आवडत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १.२ मिलियन लोकांनी पाहिलंय. तर ३४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाई केलंय. हे माकडं सायकल चालवताना परफेक्ट बॅलन्स ठेवतोय, हे पाहून लोकांना आश्चर्य वाटू लागलंय. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी त्यांच्या लहानपणीचे शाळेतील आठवणींनी उजाळा दिलाय. हा व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरणं कठीण होतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Monkey cycling like kid in school uniform monkey bicycle riding video goes viral on social media google trend today prp

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या