scorecardresearch

Video: जयपूरमध्ये माकडाने अनोख्या अंदाजात उडवला पतंग; व्हिडिओ व्हायरल

माकडाने पतंग उडवल्याचा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

Monkey_Flying_Kite
Video: जयपूरमध्ये माकडाने अनोख्या अंदाजात उडवला पतंग; व्हिडिओ व्हायरल

देशभरात नुकताच मकरसंक्रातींचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त पतंग उडवण्याचा उत्साह तरुण मंडळींमध्ये असतो. पतंगाशी निगडीत अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. कारण एक माकडाने अनोख्या अंदाजात पंतग उडवल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ट्विटरवर अनिल कुमार सैनी नावाच्या युजरने माकडाने पतंग उडवल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. जयपूरमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एका घराच्या छतावरून माकड पतंग उडवताना दिसत आहे, अशी कॅप्शन त्याने व्हिडिओला दिली आहे. व्हिडिओत माकड एका घराच्या छतावर बसलेलं दिसत आहे. या दरम्यान त्याच्या जवळून पंतग उडताना दिसत आहे. तेव्हा त्यालाही पतंग उडवण्याचा मोह आवरला नाही. त्याने लगेच जवळून जाणारा मांजा हातात घेतला आणि पंतग उडवू लागला. पंतग उडवणाऱ्या व्यक्तीलाही आश्चर्याचा धक्का बसला. त्याने आरडाओरड करत पतंग त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण माकडाने त्यांचं काही ऐकलं नाही.

माकडाने पतंग उडवल्याचा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे. नेटकरी आपल्या अंदाजात कमेंट्स देत असून व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव सुरु आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Monkey flying kite video viral on social media rmt

ताज्या बातम्या