सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडे जायचं म्हटलं तरी नको वाटतं. याचं कारण त्यांना पोलीस ठाण्यात मिळणारी वागणूक आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा हे आहे. अनेकदा पीडित व्यक्ती पोलीस स्टेशनला जाते आणि तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न करते, मात्र, पोलिसांकडून वेगवेगळे दबाव किंवा हितसंबंधांतून तक्रार नोंदवून घेण्यासच नकार दिला जातो. आरोपींची चौकशी करण्याऐवजी पीडितालाच याचा त्रास होतो. असाच एक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हताश झालेल्या एका महिलेने पोलिस स्टेशन गाठले आणि मध्य प्रदेशातील रीवा येथील प्रभारी अधिकाऱ्याची आरती केली. महिना होऊनही पोलिस एफआयआर दाखल करत नसल्यानं हताश झालेल्या महिलेनं अधिकाऱ्याचीच थेट आरती केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

मध्य प्रदेशातील रेवामध्ये हा प्रकार घडला असून पोलीस खात्याला नामुष्कीला सामोरं जावं लागलं आहे.व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या पती आणि मुलीसह रेवा येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याची आरती करताना दिसत आहे. २६ दिवसांचा तपास सुरू असतानाही पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात विलंब केल्यानं महिलेनं हा पर्याय निवडला.

कोणत्याही गंभीर गुन्ह्यातील तक्रार तात्काळ दाखल करून घेण्यात यावी, अशी कायद्यात तरतूद आहे. मात्र पीडित महिला २६ दिवस पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचा प्रयत्न करत होती. तरीही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. २६ दिवसांनंतर तक्रार दाखल करून घेतली. मात्र त्यानंतरही पोलिसांनी प्रकरणाचा तपास करावा लागेल, असं उत्तर दिलं. त्यामुळे हताश झालेल्या पीडित महिलेने आरती आणि हार घेऊन पोलीस ठाणं गाठलं आणि पोलीस अधिकाऱ्याची आरती केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “कोणाच्या तरी हसण्याचे कारण बना” खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चिमुकल्याच्या चेहऱ्यावर फुलवलं हसू; VIDEO एकदा पाहाच

महिलेनं अधिकाऱ्याची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरती केली याचं कारण असं की, पोलीसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी. आता तरी पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.