ऑनलाइन फूड ऑर्डर कंपनी आल्यामुळे सर्वांना घरबसल्या आपल्याला हवं ते मागवणं शक्य झालं आहे. मात्र त्यातही काही त्रुटी आहेत. झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली आहे. पण मुंबईचे डबेवाले गेल्या कित्येक वर्षांपासून डबे पोहोचवण्याचं काम करत अनेकांच पोट भरत आहेत. झोमॅटोच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर डबेवाल्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अशी घटना मुंबईत सव्वाशे वर्ष काम करणाऱ्या डबेवाल्यांकडून कधीच घडत नाही असं मुंबई डबेवाला असोशिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झगमग वाढली की बिझनेस वाढत नाही. काल परवा बातमी वाचली व तो व्हिडीओ पाहिला. झोमॅटोचा कर्मचारी ऑर्डर पोहचवत असताना त्या पार्सलमधील अन्न तो कर्मचारी खात होता. व त्यातील काही अन्न खाऊन परत त्याने ते पार्सल होते तसं केलं व पुढे ते ग्राहकाला दिले. त्या ग्राहकाची किती मोठी ही फसवणु या कर्मचाऱ्यांनी केली. यामुळे झोमॅटो कंपनीचे नाव खराब झाले’, असं सुभाष तळेकर यांनी म्हटलं आहे.

डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झोमॅटोचा महत्त्वपूर्ण निर्णय

पुढे ते बोललेत की, ‘परंतु अशी घटना मुंबईत सव्वाशे वर्ष काम करणाऱ्या डबेवाल्यांकडून घडत नाही. कारण डबेवाला हा आपल्या ग्राहकांना दैवत मानतो. आता ग्राहकांना जर दैवत मानले तर त्याची तो त्याची फसवणूक कधीही करत नाही. जर ग्राहक जेवला नाही तर तो भरलेला जेवणाचा डबा तसाच्या तसा भरलेला पुन्हा घरी जातो. वेळेवर जेवणाचे डबे पोचवणे हे डबेवाल्याचे काम आहे ते काम इमाने इतबारे करत रहायचे’.

‘काही डबेवाल्यांच्या तीन तीन पिढ्या या व्यवसायात काम करत आहेत. तसेच तीन पिढ्यांपासून डबे खाणारे ग्राहकही आहेत. आजोबांनी डबा खाल्ला होता. त्याचा मुलगा ऑफिसमध्ये डबा खातो आहे व नातू शाळेत डबा खातो. अशा प्रकारे ग्राहक आणी डबेवाला यांचे अतुट असे नाते आहे’, असं सुभाष तळेकर यांनी सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण –
नुकताच सोशल मीडियावर मदुराई येथील एका डिलिव्हरी बॉयचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय ऑर्डर केलेले पदार्थ पॅकेटमधून बाहेर काढून खाताना दिसत आहे. इतकंच नाही तर खाऊन झाल्यावर ते पुन्हा पॅक करुन त्या पॅकेटमध्ये ठेवतो. ग्राहकाला ही बाब कळू नये यासाठी आपल्याकडील असलेल्या टेपने पॅकेट पुन्हा पॅकदेखील करुन ठेवतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai dabbawala answer to zomato
First published on: 19-12-2018 at 15:13 IST