गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत असून मुंबईतील विविध ठिकाणचे सखलभाग जलमय झाल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. मुंबई आणि उपनगरांत झालेल्या अतिमुसळधार सरींची नोंद वेगवेगळ्या भागात १४० ते १५० मिमी झाली. उसंत न घेता सलग दुसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या पावसाने मुंबईतील अनेक भागात पाणी साचण्याची घटना घडल्या. त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली तर लोकल रेल्वे सुरू असली तरी त्याचे वेळापत्रक कोलमडले होते.

दरम्यान, याच संधीचा फायदा घेत, एका पठ्ठ्याने आपल्या बॉसकडून एका दिवसाची सुट्टी मंजूर करून घेतली आहे. पण यासाठी त्याने जी शक्कल लढवली आहे ती अतिशय मजेदार आहे. ब्रायन मिरांडा नावाच्या व्यक्तीने, ट्रेन सेवा विस्कळीत झाल्याचे आपल्या बॉसला पटवून देण्यासाठी लोकल ट्रेन प्रवाशांकडून मदत मागितली. त्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी मिळावी म्हणून त्याने हे केले.

“जो टेलिप्रॉम्प्टर नियंत्रित करतो तोच खरा राष्ट्रपती!” इलॉन मस्क यांचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर निशाणा

या मजेशीर चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये आपण पाहू शकतो की, मिरांडा अज्ञात लोकांना गोरेगाव नंतर गाड्या काम करत नाही आहेत, असे उत्तर देण्यास सांगत आहे. “गोरेगाव नंतर गाड्या चालतात का?” त्याने विचारले. लवकरच, अनेक वापरकर्त्यांनी खोटे बोलून “नाही” असे उत्तर दिले. काही क्षणांनंतर, तो माणूस सर्वांचे आभार मानण्यासाठी आणि त्याची आठवड्याची सुट्टी मंजूर झाल्याची घोषणा करण्यासाठी चॅटरूममध्ये परत आला.

गुडघाभर पाण्यातून रस्ता पार करण्यासाठी तरुणाने केला भन्नाट जुगाड; Video पोस्ट करत आनंद महिंद्रा म्हणाले…

m-indicator chat a man get day off with the help of other commuters
त्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी मिळावी म्हणून या माणसाने हे केले. (Photo : Reddit)

‘आम्ही एकत्र आहोत’ असे त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. कोणीतरी रेडिटवर चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर हे संभाषणाने सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पोस्टवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. एका युजरने कमेंट केली की, “मला मुंबई खूप आवडते कारण येथील लोक मदतीसाठी तत्पर असतात.” दुसऱ्या युजरने म्हटलंय, “या पोस्टने मला खूप हसवलंय.” आणखी एक युजर म्हणाला, “कल्पना करा की त्याचा बॉसही एम इंडिकेटरमध्ये चॅटमध्ये सामील झाला तर?”

तीन जोडीदारांपासून ९ मुलं असणारे इलॉन मस्क म्हणतात, “प्रत्येकाचे कुटुंब…”

या आठवड्याच्या सुरूवातीपासून मुंबईत दमदार पाऊस पडला. त्यामुळे मुंबईत सरासरीपेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद झाली. तसेच पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबईत सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र गुरुवारी मध्यरात्री पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मुंबईतील काही भागात शुक्रवारी सकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या.