Viral Video : सोशल मीडियावर प्राणी किंवा पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात त काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका पोपटाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पोपट चक्क सायकल चालवताना दिसत आहे. आजवर तुम्ही आपल्या बोलण्याची नक्कल करणाऱ्या पोपटाचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण गा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
प्राणी आणि पक्षी हे माणसाच्या सानिध्यात राहून बऱ्याच गोष्टी शिकतात. ज्या गोष्टी माणसं करू शकतात त्या गोष्टी सुद्धा ते पाहून शिकतात. या पोपटाने सुद्धा या गोष्टी खूप चांगल्याप्रकारे शिकण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पोपट चक्क सायकल चालवताना, फूटबॉल खेळताना, इत्यादी गोष्टी करताना दिसतोय. हा व्हिडीओ अचंबित करणारा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की लहानसा पोपट सायकल कशी चालणार किंवा इतर गोष्टी कशा करणार? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक पोपट सुरुवातीला सायकल चालवताना दिसत आहे. ही सायकल पोपटाच्या आकारानुसार लहान आहे. त्यानंतर पुढे हा पोपट झोका घेताना दिसतो. त्यानंतर तो फुटबॉल खेलताना दिसतो आणि चेंडू गोलजाळ्यात टाकतो. त्यानंतर तो एक नाणी तोंडात पकडतो आणि मनी बँकमध्ये टाकतो. शेवटी पोपट ध्वजारोहन करताना दिसून येतो. सर्व साहित्य हे पोपटाच्या आकारानुसार लहान आहेत. त्यामुळे त्याला ते सहज करता येतात.

हेही वाचा :“दहा हजार पेटीएम करा…” नीता अंबानीला पाहताच लोकांनी मागितले पैसे, पाहा व्हिडीओ

@gunsnr’osesgirl3 या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्मार्ट पोपट” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती गोड पोपट आहे” तर एका युजरने लिहिलेय, “खूप चांगल्याप्रकारे पोपटाला ट्रेन केले आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “हूशार पक्षी आहे.” अनेक युजर्सनी या पोपटाचे कौतुक केले आहेत.