Father daughter Viral video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नात वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्यातं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत; बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. आणि याच वडिलांच्या नजरेत जेव्हा एक मुलगी जिंकते ना तेव्हा ती जग जिंकलेली असते. शेवटी बापाएवढं लेकीचं कौतुक कुणालाच नसंत याच उदाहरण म्हणून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

आई-वडिल आपल्या मुलांना मोठं करतना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन काही मुलं मात्र आई-वडिलांचं नाव मोठं करतात. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.एका मुलीनं मेहनतीच्या जोराजवर तिच्यासोबतच तिच्या वडिलांचंही स्वप्न पूर्ण केलं आहे. जान्ही अहिरे नावाच्या या मुलीची इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे. यावेळी त्यांच्या गावाता जान्हवीच्या अभिनंदनाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या लेकीचा फोटो अशाप्रकारे पाहणे म्हणजे कोणत्याही आई-वडिलांसाठी अभिमानाचाच क्षण. असाच आनंद आणि अभिमान व्हिडीओमध्ये जान्हवीच्या वडिलांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. जान्हवीचे वडिल मोठ्या कौतुकानं त्या पोस्टरचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढताना दिसत आहे. इंडियन नेव्हीमध्ये निवड झाल्याबद्दल जान्हवी शरदराव अहिरे यांचं हार्दिक अभिनंदन असा मजकूर पोस्टरवर लिहला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मराठी माणसानं पाकिस्तानात जपली मुंबईची ओळख; VIDEO मधील शब्द अन् शब्द ऐकून व्हाल खूश

हा व्हिडीओ सोशल मीडियावर mpsc_policebharti_guru नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. तर नेटकरीही व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

नेटकरी वडिलांच्या या कृतीचे कौतुक करीत आहेत. “ही मुलगी खूप भाग्यवान आहे. कारण- तिला तुमच्यासारखे वडील मिळाले”, अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे. तर दुसऱ्या एक युजरनं “असा बाबा सर्वांना हवा”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं. मुलं आईच्या खूप जवळची असतात, तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात, असं म्हटलं जातं.